जाहिरात
मराठी बातम्या / विदेश / ना शिक्षा, ना दंड! ब्रिटीश गुंडाळतायत Self Isolation चा कायदा

ना शिक्षा, ना दंड! ब्रिटीश गुंडाळतायत Self Isolation चा कायदा

ना शिक्षा, ना दंड! ब्रिटीश गुंडाळतायत Self Isolation चा कायदा

कोरोना झालेल्या नागरिकांनी होम आयसोलेशनचा नियम पाळला नाही, तरी त्यांना कुठलीही शिक्षा किंवा दंड होणार नाही, असं सांगत युकेनं कायदा मागे घेण्याची तयारी केली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

लंडन, 17 जानेवारी: युनायडेट किंगडमनं (United Kingdom) सेल्फ आयसोलेशनचा (Self Isolation rule) कायदा गुंडाळण्याचा (Scrap) निर्णय घेतला आहे. एखाद्या नागरिकाची कोरोना टेस्ट (Corona Test) पॉझिटिव्ह आली, तर सध्याच्या कायद्यानुसार त्याला घरात राहणं आणि स्वतःला आयसोलेट करून घेणं कायद्यानं बंधनकारक आहे. मात्र लवकरच हा कायदा रद्द करण्याचा विचार युकेचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन (PM Boris Johnson) करत आहेत. नागरिकांना या निर्णयामुळे मोठा दिलाास मिळेल, अशी सध्या चर्चा रंगली आहे.   काय आहे प्रस्ताव? युकेमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या केसेस कमी होत चालल्याचं चित्र आहे. गेल्या महिन्यात वाढत चाललेला हा आलेख पुन्हा उतरू लागल्यामुळे अनेकांना दिलासा मिळाला आहे. सध्याच्या नियमांनुसार मात्र अनेकांना कोरोनाची लक्षणं नसतानाही सक्तीच्या आयसोलेशनमध्ये राहावं लागतं. नवा ओमिक्रॉन व्हेरिएंट हा फारसा गंभीर इन्फेक्शन करणारा नसल्यामुळे नागरिकांना सलग 14 दिवस क्वारंटाईन राहण्याची गरज नसल्याचं सांगितलं जात आहे. या पार्श्वभूमीवर होम आयसोलेशनचा कायदा मागे घेण्याची चर्चा रंगली आहे. सुविधा कायम, शिक्षा रद्द ज्या नागरिकांना कोरोना होईल, त्यांना मिळणारी वैद्यकीय आणि इतर मदत ही कायम राहणार आहे. मात्र होम आयसोलेशनचा नियम पाळला नाही, तर होणाऱ्या शिक्षेची तरतूद मात्र काढून टाकण्यात येणार आहे. नागरिकांनी त्यांच्या सदसदविवेकबुद्धीचा वापर करत काळजी घ्यावी, असं आवाहन युके सरकारनं केलं आहे.   हे वाचा -

आयसोलेशन कालावधी कमी होणार युके सरकारनं आयसोलेशनसाठी निर्धारित कऱण्यात आलेला कालावधीदेखील कमी कऱण्याचा निर्णय़ घेतला आहे. सध्या हा कालावधी 7 दिवसांचा आहे. मात्र सलग दोनवेळा कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली, तर हा कालावाधी 5 दिवसांपर्यंत कमी केला जाईल, असं सांगण्यात आलं आहे. याशिवाय याबाबतचा नियम मोडणाऱ्या नागरिकांना तुरुंगवासाची किंवा आर्थिक दंडाची शिक्षादेखील होणार नाही. पुढील महिन्यापासून या निर्णयाची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात