Home /News /videsh /

युद्धाच्या तयारीमुळे वाढला तणाव, UK नं युक्रेनमध्ये पाठवले Anti Tank Missiles

युद्धाच्या तयारीमुळे वाढला तणाव, UK नं युक्रेनमध्ये पाठवले Anti Tank Missiles

युक्रेनवरून निर्माण झालेला तणाव वाढत चालला असून आता युकेनं युक्रेनध्ये मिसाईल आणि काही सैन्य धाडलं आहे.

    लंडन, 18 जानेवारी: रशियानं (Russia) आपलं सैन्य (Troops) युक्रेनच्या (Ukraine) सीमेवर तैनात केलं असतानाच आता युकेनं (United Kingdom) अँटी टँक मिसाईल्स (Anti Tank Missile) पाठवून दिले आहेत. युक्रेनवर रशियाकडून हल्ला करण्याचा प्रयत्न झाला, तर त्याला उत्तर देण्यासाठी ही सज्जता असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे युक्रेनमध्ये सध्या युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली असून दोन्ही बाजूंनी दबाव वाढवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. नाटो विरुद्ध रशिया या वादात आता युकेनं पुढाकार घेतला असून थेट युक्रेनमध्ये मिसाईल पाठवल्यामुळे तणावात अधिकच भर पडली आहे.  युकेचं सैन्यही युक्रेनमध्ये या मिसाईलसोबत युकेचं काही सैन्यदेखील युक्रेनमध्ये दाखल होत आहे. अँटि टँक मिसाईलचं प्रशिक्षण देण्यासाठी या सैनिकांना पाठवत असल्याचं युकेनं म्हटलं आहे. युक्रेनला आत्मसंरक्षणाचा अधिकार असून जर सीमेवर एवढ्या मोठ्या संख्येनं सैन्य तैनात केलं जात असेल, तर युक्रेननं स्वतःच्या संरक्षणसज्जतेसाठी पावलं उचलण्यात काहीच गैर नसल्याचं युकेनं म्हटलं आहे. हा पाठिंबा केवळ अल्पावधीसाठी असून सध्याची तणावाची परिस्थिती निवळेपर्यंतच असणार आहे, अशी माहिती युकेकडून देण्यात आली आहे.  हे वाचा - काय आहे प्रकरण? रशियाचा शेजारी देश असणाऱ्या युक्रेनची युरोपीय देशांसोबतची वाढती जवळीक ही रशियासाठी चिंतेची बाब बनली आहे. त्यातच रशियाला आता नाटो संघटनांमध्ये सहभागी करून घेण्याच्या हालचाली वाढू लागल्यामुळे रशियानेही आपला दबाव वाढवला आहे. युक्रेनच्या सीमेवर रशियानं आपलं 1 लाख सैन्य तैनात करून ठेवलं असून दबाव वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. अमेरिका आणि नाटो संघटनेनं युक्रेनचा समावेश नाटोमध्ये न करण्याचं लेखी आश्वासन द्यावं, अशी मागणी रशियानं केली आहे. मुदतीत या मागणीची पूर्तता न झाल्यास कडक पावलं उचलण्याचा इशाराही रशियानं दिला आहे.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Missile, Russia, Uk, Ukraine news

    पुढील बातम्या