दुबई, 18 जानेवारी: अबुधाबी विमानतळ (Abu Dhabi Airport) परिसरात झालेल्या ड्रोन हल्ल्यानंतर (Drone Attack) सौदी अरेबियानं (Saudi Arabia) दुसऱ्याच दिवशी येमेनवर (Yemen) हल्ला (Attack) केला आहे. विमानतळावर झालेल्या ड्रोन हल्ल्यांना सौदीनं दिलेलं हे उत्तर मानलं जात आहे. सौदीच्या या हल्ल्यात आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. या भागात सौदीनं हल्ला केल्यानंतर एकच हलकल्लोळ उडाला असून बचावकार्यात मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सैन्य अधिकाऱ्याचा मृत्यू सौदीनं केलेल्या या हल्ल्यात येमेनच्या सना परिसरातील एक माजी सैन्य अधिकारी, त्यांची पत्नी, 25 वर्षांचा मुलगा आणि घरात उपस्थित असणाऱ्या इतर काही सदस्यांचा मृत्यू झाल्याची बातमी रॉयटर्स वृत्तसंस्थेनं दिली आहे. सौदीनं निवासी परिसरात हल्ला केला असून निष्पाप नागरिकांचे प्राण घेतले असल्याचा दावा येमेनच्या हौती ग्रुपनं केला आहे. काय आहे प्रकरण? सोमवारी अबु धाबी विमानतळाच्या परिसरात दोन ड्रोन हल्ले झाले होते. अबु धाबी विमानतळाच्या नव्या धावपट्टीचं काम सुरू असणाऱ्या परिसरात एक ड्रोन हल्ला झाला. हे विमानतळ अद्याप कार्यरत नसल्याने तिथे फारशी हानी झाल्याचं वृत्त नाही. हा परिसर रिकामा होता आणि तिथलं काम पूर्ण झालेलं नसल्यामुळे त्या परिसरात नागरिकांची वर्दळ नव्हती. दुसरा स्फोट हा ऑईलचे टँकर उभे असणाऱ्या भागात झाला आणि त्यामुळे टँकरनी पेट घेतला. तेलाच्या टँकरचे जोरदार स्फोट झाल्यामुळे परिस्थितीचं गांभिर्य अधिकच वाढलं होतं. दरम्यान, सौदीच्या दिशेनं येणारे आठ ड्रोन पकडण्यात आले असून ते निकामी करण्यात आल्याची माहिती सौदी अरेबिया प्रशासनानं दिली आहे. हे वाचा -
अबुधाबीतील मृतांना भारताची मदत अबुधाबीत हौती गटानं केलेल्या ड्रोन हल्ल्यात दोन भारतीयांचा आणि एका पाकिस्तानी नागरिकाचा मृत्यू झाला होता. मरण पावलेल्या दोन्ही भारतीयांच्या कुुटुंबाना लागेल ती सर्व मदत करणार असल्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे.