मराठी बातम्या /बातम्या /विदेश /मेघन मार्कलवरून वादावेळी प्रिन्स विल्यमने पकडली होती माझी कॉलर, प्रिन्स हॅरीचा आत्मचरित्रात खुलासा

मेघन मार्कलवरून वादावेळी प्रिन्स विल्यमने पकडली होती माझी कॉलर, प्रिन्स हॅरीचा आत्मचरित्रात खुलासा

युवराज हॅरी यांची पत्नी मेघन मार्कल हिच्याबाबत वाद सुरू असताना युवराज विल्यम यांनी आपल्यावर हल्ला केल्याचं पुस्तकात हॅरी यांनी म्हटलंय.

युवराज हॅरी यांची पत्नी मेघन मार्कल हिच्याबाबत वाद सुरू असताना युवराज विल्यम यांनी आपल्यावर हल्ला केल्याचं पुस्तकात हॅरी यांनी म्हटलंय.

युवराज हॅरी यांची पत्नी मेघन मार्कल हिच्याबाबत वाद सुरू असताना युवराज विल्यम यांनी आपल्यावर हल्ला केल्याचं पुस्तकात हॅरी यांनी म्हटलंय.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

    प्रिन्स हॅरी यांनी शाही कुटुंबापासून फारकत घेतल्यावर कुटुंबीयांमधला वाद जगासमोर उघड झाला. आता तर प्रिन्स हॅरी यांनी त्यांचा भाऊ प्रिन्स विल्यम याच्यासोबत असलेले संबंध कसे होते, याचा खुलासा केला आहे. युवराज हॅरी यांचं ‘स्पेयर’ हे आत्मचरित्र येत्या 10 जानेवारीला प्रकाशित होतंय. त्यामध्ये त्यांनी त्यांच्या भावासोबतच्या संबंधांवर प्रकाश टाकलाय. या निमित्ताने ब्रिटनच्या शाही घराण्यामध्ये असलेले वाद पुन्हा चव्हाट्यावर आले आहेत.

    ब्रिटनचे युवराज हॅरी यांनी त्यांची पत्नी मेघन मार्कल हिच्यासोबत शाही घराण्यातून फारकत घेतली. त्यानंतर शाही घराण्यातल्या प्रत्येक गोष्टीबाबत अधिकच चर्चा होऊ लागली. आता युवराज हॅरी यांचं आत्मचरित्र प्रकाशित होणार आहे. ‘स्पेयर’ नावाचं हे आत्मचरित्र 10 जानेवारीला प्रकाशित होणार आहे. 'द गार्डियन'च्या रिपोर्टनुसार, युवराज हॅरी यांनी त्यांच्या पुस्तकात भाऊ युवराज विल्यम यांच्याबाबत धक्कादायक खुलासा केलाय. युवराज विल्यम यांनी आपल्यावर हल्ला केल्याचं युवराज हॅरी यांनी त्यात म्हटलंय. युवराज हॅरी यांची पत्नी मेघन मार्कल हिच्याबाबत वाद सुरू असताना युवराज विल्यम यांनी आपल्यावर हल्ला केल्याचं पुस्तकात हॅरी यांनी म्हटलंय. 'पेज सिक्स'ने 'द गार्डियन'च्या वृत्ताचा हवाला देऊन ही माहिती दिली आहे.

    हेही वाचा : 10 हजाराचा एक सिलिंडर....पगारही रखडले; पाकिस्तानचीही होणार 'श्रीलंका'

    युवराज विल्यम यांनी मेघन यांच्याबाबत बोलताना चुकीच्या शब्दांचा वापर केला, असं 'समाचार आउटलेट'च्या वृत्तात म्हटलं आहे. दोन भावांमधली ही बाचाबाची मारामारीवर आली. युवराज विल्यम यांनी युवराज हॅरी यांची कॉलर पकडली, तेव्हा त्यांचा वाद विकोपाला पोहोचला. युवराज हॅरी त्यात सांगतात, “ते सगळं खूप झटपट झालं. त्यानं माझी कॉलर पकडली, माझा गळ्यातला नेकलेस तोडला आणि मला जमिनीवर लोळवलं. मी कुत्र्याच्या खाद्याच्या भांड्यावर पडलो. ते भांडंही तुटलं आणि त्याचे तुकडे माझ्या शरीरात घुसले. एक क्षण मी तिथेच पडून राहिलो.”

    या भांडणात आपल्या पाठीला जखम झाली होती, असं युवराज हॅरी यांनी पुस्तकात म्हटलंय. युवराज हॅरी आणि त्यांची पत्नी मेघन मार्कल यांनी 2020मध्ये शाही घराण्यापासून फारकत घेतली होती व त्यानंतर ते कॅलिफोर्नियाला स्थायिक झाले होते. तेव्हापासून त्या भावांमध्ये तणावपूर्ण संबंध होते. आता त्यांचे वडील किंग चार्ल्स मे महिन्यात स्वतःचा राज्याभिषेक करणार असल्याची चर्चा आहे. ब्रिटनची राणी एलिझाबेथ द्वितीय यांचं काही महिन्यांपूर्वी निधन झाल्यावर शाही घराण्याच्या वारसदाराबाबत चर्चा सुरू होती.

    First published:
    top videos

      Tags: London