मुंबई : आंतरराष्ट्रीय पातळीवर आर्थिक मंदीचं मोठं सावट आहे. एकीकडे मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची कपात केली जात आहे. तर दुसरीकडे कंपन्या बंद होण्याच्या मार्गावर आहेत. अशा परिस्थितीत भारताशेजारील दोन देशांची अवस्था अत्यंत बिकट आहे. श्रीलंकेपाठोपाठ आणि पाकिस्तानचीही अर्थव्यवस्था अखेरच्या घटका मोजू लागल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे.
पाकिस्तानमध्ये LPG गॅस सिलिंडरच्या किंमती 10 हजार रुपयांवर पोहोचल्या आहेत. त्यांच्यावर प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये गॅस भरून घेऊन जाण्याची वेळ आली आहे. पाकिस्तानातील लोकांवर सध्या अत्यंत वाईट वेळ आली आहे. तिथली परिस्थिती अत्यंत हालाकीची आहे.
कर्मचाऱ्यांचे पगार रखडले आहेत. जेवणा-खाणाचे हाल आहेत. इतकं कमी की काय गॅस सिलिंडर तर 10 हजार रुपयांवर पोहोचला आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडर दहा हजार रुपयात विकला जात आहे. कर्मचाऱ्यांना द्यायला पैसे नाहीत त्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे.
पाकिस्तानमध्ये फक्त आर्थिकसंकटच नाही तर त्यापाठोपाठ उर्जेचंही संकट आहे. पाकिस्तानात मार्केट, मॉल आणि लग्नाचे हॉल बंद करण्याची वेळ ठरवण्यात आली आहे.
इम्रान खानच्या काळात पाकिस्तान कर्जाच्या ओझ्याखाली अधिक दाबला गेला. इम्राम खान यांनी तीन वर्षांत जनतेवर जवळपास दररोज 1400 कोटी रुपयांचे कर्ज वाढवल्याचा आरोपही आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Imran khan, Money, Pakistan, Pakistan share market