जाहिरात
मराठी बातम्या / विदेश / चुकीला ‘माफी’ मिळणार? ‘दारु पार्टी’ प्रकरणात ब्रिटीश पंतप्रधानांची खुर्ची धोक्यात

चुकीला ‘माफी’ मिळणार? ‘दारु पार्टी’ प्रकरणात ब्रिटीश पंतप्रधानांची खुर्ची धोक्यात

चुकीला ‘माफी’ मिळणार? ‘दारु पार्टी’ प्रकरणात ब्रिटीश पंतप्रधानांची खुर्ची धोक्यात

जनता लॉकडाऊनमध्ये असताना केलेली दारु पार्टी ब्रिटीश पंतप्रधानांना चांगलीच भोवण्याची चिन्हं आहेत. केवळ माफी पुरेशी नसून राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

लंडन, 13 जानेवारी: लॉकडाऊनच्या (Lockdown) काळात केलेली दारु पार्टी (Booze Party) ब्रिटीश पंतप्रधान बोरिस जॉन्सन (British PM Boris Johnson) यांच्यासाठी डोकेदुखी (Headache) ठरली आहे. इतक्या गंभीर चुकीसाठी केवळ माफी मागणं (Apology not enough) पुरेसं नसून त्यांनी पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. केवळ विरोधकच नव्हे, तर सत्ताधारी पक्षातील नेतेही जॉन्सन यांना प्रायश्चित्त म्हणून राजीनामा देण्याचा सल्ला देऊ लागले आहेत.   स्वतःच्याच पक्षातून विरोध मे 2020 मध्ये डाऊनिंग रोडवर मद्यपान पार्टी आयोजित केल्याबद्दल माफी मागत असल्याचं पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी बुधवारी जाहीर केलं होतं. मात्र त्यानंतरही या प्रकरणाची धूळ खाली बसत नसल्याचं चित्र आहे. विरोधकांनी जॉन्सन यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहेच, मात्र आता सत्ताधारी कन्झर्व्हेटिव्ह पक्षाच्या नेत्यांनीही बोरिस जॉन्सन यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. स्कॉटलंडमधील कन्झर्व्हेटिव्ह पक्षाचे नेत्यांनीही जॉन्सन यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे.   काय आहे प्रकरण? 2019 साली ब्रेक्झिटच्या मुद्द्यावरून झालेल्या निवडणुकीत बोरिस जॉन्सन यांना घवघवीत यश मिळालं होतं. त्यानंतर काही महिन्यात जगभरात कोरोनानं धुमाकूळ घातला आणि जगभरातील इतर देशांप्रमाणेच ब्रिटननेदेखील लॉकडाऊन जाहीर केला. याच काळात लंडनमधील एका बागेत पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. शहरातील अनेक मान्यवरांना या पार्टीसाठी निमंत्रित करण्यात आलं होतं आणि या पार्टीत कोरोनासंबंधीच्या अनेक नियमांचं उल्लंघन करण्यात आलं होतं.   हे वाचा -

पार्टी कशासाठी? 20 मे 2020 या दिवशी डाउनिंग स्ट्रिटवर या पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. आपलं राजकीय वर्चस्व आणि हितंसंबध जोपासण्यासाठी नियम ओलांडून या पार्टीचं आयोजन करण्यात आल्याचा आरोप विरोधी मजूर पक्षानं केला आहे. या पार्टीचं निमंत्रण जॉन्सन यांच्या खासगी सचिवांनी ईमेलवरून पाठवलं होतं. त्यात सहभागी होण्यासाठी सर्वांना विनंती करण्यात आली होती आणि प्रत्येकाने येताना आपापलं मद्य घेऊन यावं, असंही सांगण्यात आलं होतं. या प्रकरणावरून पंतप्रधानांनी माफी मागितल्यानंतर हे प्रकरण शांत होईल, असं मानलं जात होतं. मात्र आता विरोधक आणि सत्ताधारी या दोघांनीही राजीनाम्याची मागणी लावून धरल्यामुळे जॉन्सन यांच्या खुर्चीला हादरे बसू लागल्याचं मानलं जात आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात