Home /News /videsh /

मुस्लीम मंत्र्याच्या हकालपट्टीची चौकशी करा, व्यथित होऊन ब्रिटीश पंतप्रधानांचे आदेश

मुस्लीम मंत्र्याच्या हकालपट्टीची चौकशी करा, व्यथित होऊन ब्रिटीश पंतप्रधानांचे आदेश

आपण मुस्लीम असल्यामुळेच मंत्रिपदावरून हकालपट्टी झाली या युकेच्या माजी मंत्र्याच्या दाव्याची चौकशी करण्यात येणार आहे. पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी हे आदेश दिले आहे.

    लंडन, 24 जानेवारी: आपण मुस्लीम (Muslim) असल्यानेच आपली मंत्रिमंडळातून (Cabinet)  हकालपट्टी (removal) करण्यात आली, या युकेच्या माजी मंत्री (UK Ex minister)  नुसरत घनी (Nusrat Ghani) यांच्या दाव्याची चौकशी (Enquiry) करण्यात यावी, असे आदेश युकेचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी दिले आहेत. कुठल्याही मंत्री किंवा पदाधिकाऱ्याची नेमणूक आणि हकालपट्टी ही त्याच्या धर्माच्या आधारावर होणं योग्य नसल्याचं सांगत नेमकं काय घडलंय, याची सविस्तर चौकशी करण्याचे आदेश पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी दिले आहेत. काय आहे प्रकरण? बोरिस जॉन्सन सरकारमध्ये मंत्री असणाऱ्या नुसरत घनी यांची 2020 मध्ये मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात आली होती. सिनिअर व्हीपनं आपल्याला घरचा रस्ता दाखवला आणि पदावरून काढून टाकण्यात आल्याचं सांगितलं, अशी माहिती त्यांनी माध्यमांना दिली. आपल्याला पदावरून काढून टाकताना आपण मुस्लीम असल्याचं कारण त्याने दिल्याचं घनी यांनी म्हटलं आहे. कागदोपत्री काहीही कारणं असली तरी आपण पालन करत असलेल्या मुस्लीम धर्माबाबत असणाऱ्या पूर्वग्रहामुळेच आपल्यावर कारवाई झाली असल्याचा दावा त्यांनी केला होता. चौकशीचे आदेश आपल्या सरकारमधील मंत्र्यानं असा दावा केल्यामुळे व्यथित झालेल्या पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. आपल्या कॅबिनेट ऑफिसला त्यांनी हे चौकशीचे आदेश दिले असून पंतप्रधान कार्यालयाचे अधिकारी आणि सीनिअर व्हीप यांच्याकडून त्यांना नेमकं काय सांगण्यात आलं होतं, याचीही चौकशी होणार आहे. नुसरत घनी या 49 वर्षांच्या असून त्या 2020 पर्यंत त्या परिवहन मंत्री होत्या. हे वाचा-आंधळं प्रेम! बॉयफ्रेंडसाठी दान केली किडनी; 10 महिन्यातच तरुणीला मिळाला धोका बोरिस जॉन्सन अडचणीत स्वतः बोरिस जॉन्सन हे सध्या ‘पार्टीगेट’ प्रकरणात अडचणीत सापडले आहेत. कोरोना आणि लॉकडाऊनच्या काळात नियम मोडून पार्ट्या आयोजित केल्याप्रकरणी त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीने जोर धरला आहे. त्यातच माजी मंत्री नुसरत हनी यांच्या दाव्यामुळे त्यांच्या अडचणींत अधिकच भर पडली आहे.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Muslim, Prime minister, Uk

    पुढील बातम्या