Home /News /videsh /

शाळेच्या कॅफेटेरियामध्ये मुस्लिम मुलांना खाऊ घातलं Pork,संतापलेल्या पालकांची शाळेबाहेरचं निदर्शनं

शाळेच्या कॅफेटेरियामध्ये मुस्लिम मुलांना खाऊ घातलं Pork,संतापलेल्या पालकांची शाळेबाहेरचं निदर्शनं

शाळेच्या कॅफेटेरियामध्ये (School Cafeteria) मुस्लिम मुलांना व्हेज सॉसेजऐवजी (Veg Sausage) पोर्क म्हणजेच डुकराचं मांस खायला देण्यात आलं.

लंडन, 19 मे: आपल्या देशात बहुविध धर्म, संस्कृती मानणारे लोक राहतात. त्यांना त्यांचा धर्म, रितीरिवाज, पद्धती पाळण्याचं संपूर्ण स्वातंत्र्य आपल्या संविधानाने दिलं आहे. तरीही कधीतरी समाजकंटक परधर्माच्या व्यक्तींच्या भावना दुखवण्याचा प्रयत्न करतात. अशा घटना फक्त भारतातच घडतात असं नाही तर जगभर या घटना घडत असतात. हे सांगण्याचं कारण म्हणजे ब्रिटनमध्येही नुकतीच अशी घटना घडली आहे. शाळेच्या कॅफेटेरियामध्ये (School Cafeteria) मुस्लिम मुलांना व्हेज सॉसेजऐवजी (Veg Sausage) पोर्क म्हणजेच डुकराचं मांस खायला देण्यात आलं. या प्रकारानंतर शाळेत चांगलाच गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं. मुलांना पोर्क खायला दिल्यानं संतप्त झालेल्या मुस्लिम पालकांनी शाळेबाहेर निदर्शने सुरू केली. मुस्लिम धर्मामध्ये पोर्क (Pork) खाणं वर्ज्य मानलं जातं, मात्र शाळेत मुलांना व्हेज सॉसेजऐवजी पोर्क खाऊ घातल्याने प्रकरण चांगलंच तापलं. हा प्रकार ब्रिटनमधील वेस्ट ब्रॉमविचमध्ये घडला. वेस्ट ब्रॉमविच येथे रायडर्स ग्रीन प्रायमरी नावाची एक शाळा आहे. या शाळेच्या कॅफेटेरियामध्ये मुस्लिम विद्यार्थ्यांना व्हेज सॉसेजऐवजी पोर्क म्हणजेच डुकराचं मांस खायला देण्यात आले. या प्रकारामुळे पालक चांगलेच संतापले असून, ते या प्रकरणाबाबत शाळेकडून स्पष्टीकरण मागत आहेत. मुस्लिम धर्मात (Muslim Religion) पोर्क खाणं वर्ज्य आहे, हे माहीत असूनही शाळेत विद्यार्थ्यांना पोर्क का खायला दिलं, असा प्रश्न विचारत याबद्दल स्पष्टीकरण देण्याची मागणी पालकांनी शाळा प्रशासनाला केली आहे. या प्रकारानंतर संतापलेल्या पालकांनी शाळेबाहेर निदर्शनं केल्यानं गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. या संदर्भात आज तकने वृत्त दिलंय. फुटपाथवर झोपलेल्या मजुरांना ट्रकनं चिरडलं, तिघांचा मृत्यू; 11 जखमी ब्लॅक कंट्री लाइव्हशी (Black Country Live) संवाद साधताना एका पालकाने सांगितले की, हे अत्यंत घृणास्पद कृत्य आहे. हा प्रकार अशा एका शाळेत घडला जिथे जवळपास 70 टक्के विद्यार्थी मुस्लिम आहेत. शाळेने पैसे रिफंड केल्याचं एका पालकाने सांगितलं. तसंच ते पुढे म्हणाले, एका शिक्षकाने मला सांगितलं की माझ्या मुलीला व्हेज सॉसेज आणि मॅशऐवजी डुकराचे मांस खायला दिलं गेलं. जेव्हा मुलीने जेवण पाहिलं तेव्हा तिला ते नेहमीच्या व्हेज सॉसेजपेक्षा वेगळं दिसलं. त्यानंतर तिने ते खाऊन पाहिलं तर त्याची चव ही व्हेज सॉसेजपेक्षा पूर्णपणे वेगळी होती. दरम्यान, ज्या शाळेतील विद्यार्थ्यांनी व्हेज सॉसेज ऑर्डर केले होते त्यांना डुकराचं मांस देण्यात आलं होतं, असं केटरिंग कंपनीने स्पष्ट केलं असून, या प्रकाराचा फटका संपूर्ण शाळेला बसला आहे, असं शिक्षकाने सांगितल्याचं एका पालकाने म्हटलंय. प्रकरण चांगलंच तापल्यानंतर याबाबत स्थानिक अधिकाऱ्यांनी पालक, शाळा आणि केटरिंग कंपनीशी चर्चा केली आहे. आम्ही हे प्रकरण अतिशय गांभीर्याने घेतलं आहे. आम्ही केटरिंग सप्लायर (Catering Supplier) आणि फूड स्टँडर्ड एजन्सीकडे (Food Standards Agency) घडलेल्या प्रकाराची अधिकृत तक्रार देखील केली आहे, असं रायडर्स ग्रीन प्रायमरी स्कूलच्या प्रवक्त्याने सांगितलं आहे.
Published by:Pooja Vichare
First published:

Tags: London, School student

पुढील बातम्या