मराठी बातम्या /बातम्या /देश /Haryana Road Accident: फुटपाथवर झोपलेल्या मजुरांना ट्रकनं चिरडलं, तिघांचा मृत्यू; 11 जखमी

Haryana Road Accident: फुटपाथवर झोपलेल्या मजुरांना ट्रकनं चिरडलं, तिघांचा मृत्यू; 11 जखमी

Haryana Road Accident: तीन मजुरांचा मृत्यू झाला असून 11 जण जखमी असल्याचं सांगण्यात येत आहे. झज्जर जिल्ह्यातील टोल प्लाझासमोर हा अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे.

हरियाणा, 19 मे: Haryana Road Accident: हरियाणाच्या (Haryana) झज्जरमधून (Jhajjar) एक हृदयद्रावक अपघाताची (Heartbreaking Accident) बातमी समोर आली आहे. जिथे एका ट्रकने रस्त्याच्या कडेला झोपलेल्या लोकांना चिरडलं आहे. यामध्ये तीन मजुरांचा मृत्यू झाला असून 11 जण जखमी असल्याचं सांगण्यात येत आहे. झज्जर जिल्ह्यातील टोल प्लाझासमोर हा अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे.

फुटपाथवर झोपलेल्या मजुरांना चिरडले

समोर आलेल्या वृत्तानुसार, ट्रक चालकाचे अचानक गाडीवरील नियंत्रण सुटलं. त्यानंतर तो रस्त्यावरून फुटपाथवर गेला. या फुटपाथवर अनेक मजूर झोपले होते, त्यांना ट्रकने चिरडलं. या मजुरांना चिरडत ट्रक पुढे सरकला आणि नंतर उलटला. जखमी झालेल्या 11 जणांपैकी काही जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. सर्व जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

महामार्गावरील दुरुस्तीचे काम करणारे मजूर

KMP म्हणजेच कुंडली-मानेसर-पलवल एक्स्प्रेस वेवर ही वेदनादायक दुर्घटना घडल्याचे सांगण्यात आले. समोर आलेल्या माहितीनुसार, 10 जखमींना पीजीआय रोहतकमध्ये पाठवण्यात आले आहे, तर एका जखमी मजुराला बहादुरगडमधील ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं आहे. सर्व मृत आणि जखमी मजूर या एक्स्प्रेस वेवर दुरुस्तीचे काम करत होते. काम संपल्यावर सर्वजण थकून रस्त्याच्या कडेला झोपले. सध्या पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. त्यानंतर मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत.

First published:

Tags: Haryana, Road accident, Truck accident