Home /News /videsh /

बापरे! कोरोनाबाबतची माहिती लपवल्यास 10 वर्षांचा तुरुंगवास

बापरे! कोरोनाबाबतची माहिती लपवल्यास 10 वर्षांचा तुरुंगवास

कोरोना झाल्याची किंवा लक्षणं दिसल्याचं लपवलं किंवा खोटी माहिती दिली तर या देशात थेट जेलमध्ये जावं लागणार आहे.

    लंडन, 9 फेब्रुवारी : कोरोनाचा संसर्ग (corona virus infection) सध्या भारतात ओसरल्यासारखा दिसत असला तरी विदेशात मात्र या विषाणूचा धोका भयानक वाढला आहे. त्यामुळे तिथे नियम आणि निर्बंध अजूनच कडक करण्यात आले आहेत. त्याचाच भाग म्हणून आता 'रेड लिस्ट'मधल्या देशांबाबत ब्रिटनने (UK) नवीन नियम जाहीर केला आहे. कोरोना झाल्याची किंवा लक्षणं दिसल्याचं लपवलं किंवा खोटी माहिती दिली तर या देशात थेट जेलमध्ये जावं लागणार आहे. या नियमानुसार, प्रवासी (passanger) फॉर्मवर माहिती नोंदवताना जर प्रवाशांनी 'रेड लिस्ट' (red list) देशांमधून प्रवास करून आल्यानंतर ते नाकारणारी खोटी माहिती (false information) दिली, तर त्यांना तब्बल 10 वर्षांपर्यंतचा तुरुंगवास (jail) होऊ शकतो असं आरोग्य सचिव (health secretary) मॅट हॅनकॉक यांनी स्पष्ट केलं. Evening Standerd नं याबाबतचं वृत्त दिलं आहे. ते म्हणाले, जो कुणी पॅसेंजर लोकेटर फॉर्म भरताना खोटं बोलेल आणि रेड लिस्टमधील देशांमधून प्रवास करून आल्याचं दहा दिवसांहून अधिक काळ लपवून ठेवेल त्याला दहा वर्षांपर्यंतचा तुरुंगवास ठोठावण्याचं आम्ही ठरवलं आहे.' याशिवाय आरोग्य सचिवांनी कोविडचे नियम (rules) आणि निर्बंध तोडणाऱ्यांना अजून कडक शिक्षाही जाहीर केल्या. युकेमध्ये कोरोनाचा नवा म्युटंट स्ट्रेन सापडल्याच्या पार्श्वभूमीवर या शिक्षा जाहीर झाल्या आहेत. या शिक्षा (fines for covid rule violation) अशा आहेत आंतरराष्ट्रीय प्रवास करून आल्यावर बंधनकारक असलेली टेस्ट केली नाही तर £ 1000 अर्थात हजार पाउंड स्टर्लिंग दंड. बंधनकारक असलेली दुसरी टेस्ट न केल्यास £ 2000 इतका दंड. आणि क्वारंटाईनचा काळ अजून १४ दिवस वाढवला जाणार. सांगितलेल्या हॉटेलमध्ये क्वारंटाईन न झाल्यास £ 10000 इतका दंड. £ 5000 इतकी पेनल्टी नोटीस. हेही वाचा - मुंबई, पुणे नव्हे राज्यातील कोरोनाचा हा नवा हॉटस्पॉट; या जिल्ह्यावर दुहेरी संकट रेड लिस्टमध्ये असलेले देश हे आहेत - अंगोला, अर्जेंटिना, बोलिव्हिया, बोट्सवाना, ब्राझील, बुरुंडी, केप व्हर्दे, चिली, कोलंबिया, डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ द कांगो, इक्वाडोर, इस्वाटीनी, फ्रेंच गुयाना, लेसोथो, मलावी, मॉरिशस, मोझाम्बिक, नामिबिया, पनामा, पराग्वे, पेरू, पोर्तुगाल (मडेरिया आणि अझोर्स समाविष्ट), रवांडा, सेशेल्स, साऊथ आफ्रिका, सुरिनेम, टांझानिया, युनायटेड अरब एमिरेट्स (UAE), उरुग्वे, वेनेझुएला, झाम्बिया आणि झिंबाब्वे
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Coronavirus, Rules, United kingdom

    पुढील बातम्या