दुबई, 28 डिसेंबर: काळानुसार संयुक्त अरब अमिरात (UAE) या देशानं बदल (Change) स्विकारायला सुरुवात केली आहे. या देशाच्या इतिहासातील पहिलं (First in the history) सिव्हिल मॅरेज लायसन्स (Civil Marriage Licence) जारी (Issue) करण्यात आलं असून पुरोगामित्वाकडं टाकलेलं हे एक मोठं पाऊल मानलं जात आहे. जागतिक स्पर्धा आणि प्रतिस्पर्धी देशांच्या तुलनेत अधिक आधुनिकता सिद्ध करण्याची चढाओढ यातून युएईनं हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.
काय आहे निर्णय
मध्य आशियातील बहुतांश देशांमध्ये सध्या मुस्लीम, ख्रिश्चन आणि ज्यू या तीनपैकी एका धर्माच्या आधारावर लग्नाला मान्यता देण्यात येते. या तीन धर्मांपैकी तुम्ही कुठल्याही धर्माचे असाल, तर त्या धर्मातील पद्धतींनुसार नागरिकांना विवाह करता येतो. मात्र हे धर्म सोडून इतर कुठल्याही पद्धतीनं लग्न कऱणं किंवा धर्माचा आधार न घेता लग्न करणं या देशांत मान्य नव्हतं. मात्र आता हळूहळू ही पद्धत बदलत असून सरकारनं सिव्हिल मॅरेजना परवानगी देण्यास सुरुवात केली आहे. कॅनडातील एका जोडप्यानं नुकताच अबुधाबीमध्ये विवाह केला असून त्यांना सिव्हिल मॅरेज लायसन्स देण्यात आलं आहे.
युएई होणार मॅरेज हब
जगातील अनेक देश हे केवळ लग्नासाठी प्रसिद्ध आहेत. अनेक नागरिक खास लग्नसोहळे करण्यासाठी वेगवेगळ्या देशांमध्ये जातात आणि त्या देशाच्या अर्थव्यवस्थेला हातभार लागतो. युएईदेखील जगातील एक उत्तर वेडिंग डेस्टिनेशन व्हावं, असा सरकारचा प्रयत्न आहे. त्यामुळेच सरकारनं आता सिव्हिल मॅरेज लायसन्स देण्यास सुरुवात केली आहे.
हे वाचा -
बदलतायत UAE तील कायदे
सरकारी कार्यालयांनी पाश्चिमात्य वर्किंग स्टाईलचं अनुकरण करावं, असे आदेश सरकारनं युएईतील सर्व कंपन्यांना डिसेंबर महिन्याच्या सुुरुवातीलाच दिले होते. त्यानुसार आता अनेक कंपन्यांनी कामाच्या वेळापत्रकात बदल केला आहे. आता अनेक कार्यालयं शुक्रवार दुपारपर्यंत सुरू राहतात आणि शनिवारी आणि रविवारी सुट्टी देण्यात येते. त्याचंच पुढचं पाऊल म्हणून आता सिव्हिल मॅरेज लायसन्स देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.