अबुधाबी, 24 जानेवारी: इराण समर्थक (Iran Supporter) हौथी गटानं (Houthi Group) अबुधाबीवर (Abu Dhabi) पुन्हा मिसाईल हल्ला (Missile Attack) केल्याचं स्पष्ट झालं आहे. युएईनं (UAE) हे मिसाईल हवेतच नष्ट केल्याचा (Destroyed) दावा केला असून त्यामुळे मोठी जीवितहानी टळली आहे. सोमवारी पहाटेच्या सुमाराला आकाशातून चकाकणारी वस्तू घोंगावत जात असल्याचं काही नागरिकांनी पाहिलं असून आपले अनुभव त्यांनी स्थानिक माध्यमांत शेअर केले आहेत.
येमेनकडून आले मिसाईल?
गेल्या सात वर्षांपासून सौदी अरेबिया गट विरुद्ध इराण गट यांच्यात शीतयुद्ध सुरु आहे. या युद्धाला गेल्या आठवड्यापासून हिंसक स्वरूप आलं आहे. त्याचाच एक भाग म्हणून हौती गटाकडून दोन बॅलेस्टिक मिसाईल्स अबुधाबी शहराच्या दिशेनं डागण्यात आली. ही मिसाईल शहरी भागात कुठेही कोसळली नाहीत, त्यामुळे मोठी जीवितहानी टळली. या हल्ल्यात कुणीही जखमी झालं नसून त्यामुळे गेल्या आठवड्यात झालेल्या अबुधाबीवरील ड्रोन हल्ल्याच्या आठवणी मात्र ताज्या झाल्या.
MOD Joint Operations Command announces that at 04:10 hrs Yemen time an F-16 destroyed a ballistic missile launcher in Al Jawf, immediately after it launched two ballistic missiles at Abu Dhabi. They were successfully intercepted by our air defence systems. Video attached. pic.twitter.com/laFEq3qqLm
— وزارة الدفاع |MOD UAE (@modgovae) January 24, 2022
विमानानं केलं नष्ट
युएईनं एफ16 फायटर प्लेनच्या मदतीनं दोन्ही मिसाईल नष्ट केल्याचा दावा केला आहे. याचं ब्लॅक अँड व्हाईट व्हिडिओ फूटेजही युएईकडून जारी करण्यात आलं आहे. यात आकाशातून घोंगावत येणारे मिसाईल आणि त्यावर विमानातून होणारा हल्ला दिसतो. त्यानंतर आगीचे लोळ बाहेर पडतात आणि प्रचंड धूर निघत असल्याचं दिसतं. फायटर प्लेननी केलेल्या ऑपरेशनमुळे हे मिसाईल नागरी वस्तीत कोसळले नाहीत, अशी माहिती देण्यात आली आहे.
हे वाचा -
काय आहे प्रकरण?
गेल्या आठवड्यात येमेनकडून युएईतील अबुधाबी विमानतळाच्या परिसरात ड्रोन हल्ला करण्यात आला होता. त्यातील एक ड्रोन नव्या विमानतळ परिसरात कोसळला तर दुसरा ड्रोन एका तेलाच्या टँकरवर कोसळून मोठा स्फोट झाला होता. या हल्ल्यात दोन भारतीयांसह तिघांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर सौदी अरेबिया गटाच्या विमानांनी येमेनवर हवाई हल्ले केले होते. दोन वेळा केलेल्या हल्ल्यांमध्ये अनेक नागरिकांचा मृत्यू झाल्याचा दावा येमेन सरकारने केला होता. याला प्रत्युत्तर म्हणून आता येमेनकडून दोन मिसाईल डागण्यात आले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ballistic missiles, Iran, Saudi arabia, UAE