मराठी बातम्या /बातम्या /विदेश /अबुधाबीतील घटनेनंतर UAE कडून ड्रोनवर बंदी, उडवल्यास होणार कायदेशीर कारवाई

अबुधाबीतील घटनेनंतर UAE कडून ड्रोनवर बंदी, उडवल्यास होणार कायदेशीर कारवाई

अबुधाबीत झालेल्या ड्रोन हल्ल्यांनतर आता पूर्ण युएईत एक महिना ड्रोन उडवायला बंदी घालण्यात आली आहे.

अबुधाबीत झालेल्या ड्रोन हल्ल्यांनतर आता पूर्ण युएईत एक महिना ड्रोन उडवायला बंदी घालण्यात आली आहे.

अबुधाबीत झालेल्या ड्रोन हल्ल्यांनतर आता पूर्ण युएईत एक महिना ड्रोन उडवायला बंदी घालण्यात आली आहे.

अबुधाबी, 23 जानेवारी : अबुधाबीत (Abu Dhabi) येेमेनकडून (Yemen) झालेल्या ड्रोन हल्ल्यानंतर (Drone Attack) युएईनं (UAE) संपूर्ण देशात ड्रोन उडवण्यास बंदी (Ban on flying drone) घातली आहे. ही बंदी सध्या एका महिन्यासाठी (One Month) लागू करण्यात आली असून त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल, असं युएई प्रशासनानं जाहीर केलं आहे. अबुधाबीत हौथी रिबेल्सकडून करण्यात आलेल्या ड्रोन हल्ल्यांनंतर युएई सरकार सतर्क झालं असून कुठलाही धोका न पत्करता सर्व ते खबरदारीचे उपाय लागू करायला सुरुवात केली आहे.

काय आहे निर्णय

युएईतील प्रमुख शहर असणाऱ्या अबुधाबी विमानतळ परिसरात येमेनकडून दोन ड्रोन सोडण्यात आले होते. या ड्रोन हल्ल्यात तिघांचा मृत्यू झाला होता. त्यात दोन भारतीय तर एका पाकिस्तानी नागरिकाचा समावेश होता. अबुधाबीत नव्या विमानतळाचं सध्या बांधकाम सुरू आहे. त्या परिसरात पहिला ड्रोन पडला होता. तर इंधनाच्या टँकरवर दुसरा ड्रोन पडून मोठा स्फोट झाला होता. त्यानंतर अबुधाबीसह संपूर्ण युएईमध्ये ड्रोन उडवण्यास बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ड्रोन उडवल्यास शिक्षा

युएईमध्ये कुठल्याही कारणासाठी आणि कुठल्याही प्रकारचे ड्रोन उडवण्यास मनाई करण्यात आली आहे. लाईट स्पोर्ट्स एअरक्राफ्ट्स उडवायलाही मनाई आहे. जर कुणी ड्रोन उडवताना आढळलं, तर त्याच्यावर कडक कारवाई कऱण्याचा इशारा प्रशासनानं दिला आहे.

खास परवानगीची गरज

अत्यावश्यक कामांसाठी ड्रोन किंवा ड्रोनसदृश काही वस्तू आकाशात उडवण्याची गरज असेल, तर त्यासाठी प्रशासनाकडे अर्ज करून रितसर परवानगी घेणं आवश्यक असणार आहे. त्या अर्जावर पूर्ण विचार करूनच निर्णय घेतला जाईल, अशी माहिती युएई प्रशासनानं दिली आहे.

हे वाचा- विक्रमवीर Sea Rower चा अखेर समुद्रातच मृत्यू, 75 व्या वर्षी घेतलं होतं Challenge

ड्रोन हल्ल्यानंतर संघर्ष

अबुधाबीत झालेल्या ड्रोन हल्ल्यानंतर सौदी अरेबियानं गटानं दोन वेळा येमेनवर हवाई हल्ले केले आहेत. या हल्ल्यात अनेकांचा बळी गेल्याचा दावा येमेननं केला आहे. त्यामुळे आता येमेनकडून प्रत्युत्तर दिली जाण्याच्या शक्यतेनेे युएईने सर्व खबरदारीचे उपाय सुरू केले आहेत.

First published:

Tags: Drone shooting, UAE, Yemen airport attack