कीव, 23 मार्च: रशिया-युक्रेन युद्धाचा बुधवारी 28 वा दिवस(Russia-Ukraine War 28th Day ) आहे. मारियुपोलवर(Mariupol) मंगळवारी दोन सुपर पॉवरफुल बॉम्बचा हल्ला करण्यात आला. त्यामुळे तेथून लोकांना बाहेर काढण्याचे काम थांबवावे लागले आहे. रशियन बॉम्बहल्ल्यामुळे मारियुपोल हे शहर पूर्णपणे उद्धवस्त झाले आहे. अशी माहिती युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी दिली. तसेच झेलेन्स्की यांनी 100,000 लोकांना मारियुपोल सोडण्याची परवानगी देण्याचे आवाहन केले. या लोकांना शहर सोडायचे आहे. असे त्यांनी म्हटले आहे. युक्रेनच्या म्हणण्यानुसार, 22 मार्च रोजी रशियन हल्ल्यात लोझोवा आणि खार्किवमधील 20 इमारतींचे नुकसान झाले आणि 1 व्यक्ती मारला गेला. UNHRC च्या अहवालानुसार, आतापर्यंत 10 दशलक्षाहून अधिक युक्रेनियन नागरिकांना देशाच्या आत आणि बाहेर निर्वासित म्हणून स्थलांतरित करण्यात आले आहे. सुमारे एक महिन्यापूर्वी रशियन आक्रमण सुरू झाल्यापासून हे शहर सतत आगीखाली आहे. ह्युमन राइट्स वॉचने सांगितले की, 200,000 हून अधिक लोक या शहरात अडकले आहेत. मारियुपोल स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बचावाचे प्रयत्न सुरू असतानाही शहरावर दोन “सुपर पॉवरफुल बॉम्बचा हल्ला करण्यात आला. यन सैन्यानं मारियुपोल शहरामध्ये असलेल्या युरोपमधील सर्वांत मोठ्या लोखंड आणि स्टील प्लाँटलादेखील (Europe’s biggest iron and steel works) लक्ष्य केलं आहे. या हल्ल्यात अझोव्स्टल स्टील प्लाँटचं (Azovstal Steel Plant) मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं युक्रेनियन अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. मारियुपोल शहर दक्षिण आणि पूर्व युक्रेनला जोडण्याचं काम करतं. पुतिन यांच्या सैन्यानं या शहरावर ताबा मिळवला तर रशियाला याचा मोठा फायदा होईल. रशियानं युक्रेनच्या मारियुपोल शहरावर सर्वाधिक बॉम्ब हल्ले केले आहेत. मारियुपोल हे यूक्रेनमधील बेट आहे. युद्धाच्या दृष्टीनं हे महत्त्वाचं ठिकाण आहे. रशियन सैन्यानं त्याला चारी बाजून घेरलं आहे. माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार या शहराला होणारा पाणीपुरवठा, वीज आणि इतर सुविधा बंद करण्यात आलेल्या आहेत. रशियन सैन्य सातत्यानं शहरावर हल्ले करत आहेत. दुसरीकडे यूक्रेनचे अध्य वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी मारियुपोलला रशियानं टाकलेला वेढा एतिहासिक असेल. रशिया सध्या युद्ध गुन्हा करत आहेत. दोन्ही देशांमध्ये 24 फेब्रुवारीपासून युद्ध सुरु असल्यानं लाखो यूक्रेन नागरिकांनी देश सोडला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.