मराठी बातम्या /बातम्या /विदेश /महिलांच्या तुरुंगात दोघींजणी झाल्या गर्भवती; उडाली खळबळ

महिलांच्या तुरुंगात दोघींजणी झाल्या गर्भवती; उडाली खळबळ

प्रतीकात्मक फोटो

प्रतीकात्मक फोटो

प्रशासनानं या प्रकरणात चौकशीचे आदेश दिले आहेत.

    नवी दिल्ली, 16 एप्रिल : तुरुंगामध्ये (Jail) महिला कैदी (Female Prisoner) प्रेग्नंट (Pregnant) झाल्याच्या घटना कधीतरी तुमच्या कानांवर आल्या असतील. महिलांच्या तुरुंगामध्ये एखादी महिला कैदी प्रेग्नंट होण्याची बाब गंभीर समजली जाते. असं झाल्यास तुरुंग प्रशासनावर (Prison Administration) भोंगळ कारभाराचा ठपका ठेवला जातो. कधी-कधी तर अशा प्रकरणांची उच्चस्तरीय चौकशी (High Level Inquiry) होऊन अधिकारी निलंबितदेखील होतात. अमेरिकेतील (US) न्यू जर्सीमध्ये (New Jersey) असाच काहीसा प्रकार घडला आहे. त्याठिकाणी असलेल्या एका तुरुंगातील दोन महिला कैदी प्रेग्नंट झाल्या आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे हे तुरुंग पूर्णपणे महिलांसाठी राखीव आहेत. त्या ठिकाणी एकही पुरुष कैदी (Male Prisoner) ठेवलेला नाही. तरीदेखील दोन महिला कैदी प्रेग्नंट झाल्यानं खळबळ उडाली आहे. एडना महान करेक्शनल फॅसिलिटी न्यू जर्सी (Edna Mahan Correctional Facility for Women) या तुरुंगामध्ये हा प्रकार घडला आहे. लाईव्ह हिंदुस्ताननं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

    एन जे डॉट कॉमनं दिलेल्या वृत्तानुसार, न्यू जर्सीतील एडना तुरुंगातील दोन महिला कैदी प्रेग्नंट असल्याचं निदर्शनास आलं आहे. एडना महान करेक्शनल फॅसिलिटी न्यू जर्सी, हे एकमेव असं जेल आहे ज्यामध्ये फक्त महिला कैदी आहेत. एडना महान करेक्शनल फॅसिलिटीतील एक्सटर्नल अफेअर्स एक्झिक्युटिव्ह डिरेक्टर (External Affairs Executive Director) डॅन स्पेराझा (Dan Sperrazza) यांनी दिलेल्या माहितीनुसार, तुरुंगातील दोन महिला कैद्यांनी इतर दोन महिला कैद्यांशी परस्पर संमतीनं लैंगिक संबंध (Consensual Sexual Relationships) ठेवले होते, त्यामुळे त्या प्रेग्नंट झाल्या. या महिल्या कैद्यांनी ज्या दोन महिला कैद्यांशी संबंध ठेवले होते त्यांची लिंगबदल शस्त्रक्रिया (Sex Reassignment Surgery) झालेली होती. म्हणजेच त्या अगोदर पुरुष होत्या आणि ऑपरेशननंतर त्या महिला झाल्या होत्या.

    हे ही वाचा-आई-वडिलांनी मुलीसाठी आयोजित केलं स्वयंवर! 14 वर्षांच्या मुलीने निवडला 'Boyfriend

    या प्रकरणाची प्रशासकीय पातळीवर चौकशी करण्यात येत असल्याचं डॅन स्पेराझा यांनी सांगितलं. मात्र, त्यांनी प्रेग्नंट असलेल्या दोन महिला कैद्यांची माहिती देण्यास नकार दिला आहे. एडना हे न्यू जर्सीमधील एकमेव तुरुंग आहे ज्यात फक्त महिला कैद्यांना ठेवलं जातं. त्यामुळे या गंभीर प्रकरणाचा त्वरित तपास सुरू करण्यात आला आहे. तपासाअंती असं आढळलं आहे की, या तुरुंगामध्ये बंद असलेल्या एकूण महिला कैद्यांपैकी 27 महिला कैदी ट्रान्सजेंडर (Transgender) आहेत. याशिवाय लिंगबदल शस्त्रक्रिया केलेल्या काही महिला कैदीदेखील तिथे आहेत.

    अमेरिकेतील न्यू जर्सी राज्याने 2021 मध्ये एक धोरण ठरवलं होतं त्यानुसार ट्रान्सजेंडर कैद्यांना त्यांच्या वयानुसार नाही तर त्यांच्या लिंगानुसार योग्य त्या तुरुंगात ठेवलं जाणार होतं. सामान्यपणे वयानुसार कैद्यांची विभागणी केली जाते.

    First published:
    top videos

      Tags: Pregnant, Prisoners