जाहिरात
मराठी बातम्या / विदेश / ही काय भानगड बुवा? म्हणे, 'माझं स्पर्म चोरीला गेलंय', व्यक्तीची पोलिसांकडे विचित्र तक्रार

ही काय भानगड बुवा? म्हणे, 'माझं स्पर्म चोरीला गेलंय', व्यक्तीची पोलिसांकडे विचित्र तक्रार

ही काय भानगड बुवा? म्हणे, 'माझं स्पर्म चोरीला गेलंय', व्यक्तीची पोलिसांकडे विचित्र तक्रार

Turkish businessman claims his sperm stolen : तुर्कस्तानातील एका बिझनसमनने एका महिलेवर स्पर्म चोरीचा आरोप लावला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

अंकारा, 17 जानेवारी : चोरीच्या बऱ्याच घटना तुम्ही ऐकल्या असतील पण सध्या एका विचित्र चोरीचं प्रकरण समोर आलं आहे. एका व्यक्तीने चक्क आपलं स्पर्म चोरीला गेल्याची तक्रार केली आहे (sperm stolen police complaint). तुर्कस्तानातील एका बिझनसमनने एका महिलेवर स्पर्म चोरीचा आरोप लावला आहे (turkish businessman claims his sperm stolen). पोलिसांकडे त्याने याबाबत तक्रार केली आहे (police complaint about sperm stolen). कोर्टातही हे प्रकरण पोहोचलं आहे. तुर्कीत राहणारा एका बिझनसमन आणि एका महिलेचं प्रेम प्रकरण सुरू होतं. सेवाताप सेनसारी (Sevtap Sensari)  असं या महिलेचं नाव. दोघांमध्ये एक डील झाल्याचा दावा या महिलेने केला आहे. डीलनुसार एक मुलगा झाल्यानंतर ते दोघं लग्न करणार होते. पण तिला मुलं होताच  या व्यक्तीने आपलं स्पर्म चोरी झाल्याचा आरोप लावला आहे. हे वाचा -  काय म्हणावं याला! म्हणे, ‘मला हवी कोरोना पॉझिटिव्ह तरुणी’, पैसे देण्याचीही तयारी डेली स्टारच्या रिपोर्टनुसार 2000 साली या दोघांची भेट झाली. त्यावेळी बिझनसमनचं वय 45 होतं, त्याचा घटस्फोट झाला होता. व्यावसायिक असल्याने त्याचं एम्पायर सांभाळायला कुणी वारस नव्हता. त्यानुसार दोघांनी डील केली. IVF टेक्नॉलॉजीमार्फत सेवाताप त्याच्या मुलाला जन्म देईल आणि तो त्या मुलाचा स्वीकार करून त्यांना आर्थिक मदत देईल. 2015 साली सेवाताप त्याचं स्पर्म साइप्रमसला आयव्हीएफसाठी घेऊन गेली कारण तुर्कस्तानात लग्नाशिवाय याला मंजुरी नाही. दोन पुरुष भ्रूणांना सेनसारीच्या गर्भात ट्रान्सप्लांट करण्यात आलं. त्यानंतर तिने दोन जुळ्या मुलांना जन्म दिला. 61 वर्षांचा झालेल्या व्यावसायिला तिने डील पूर्ण करायला सांगितलं. पण त्याने मुलांना स्वीकारलं नाही. उलट तिचा छळ केला. महिलेने कोर्टाचा दरवाजा ठोठावला. आपण त्याच्या जुळ्या मुलांची आई झाल्याचा दावा तिने कोर्टात केला आणि 20 लाख रुपयांची भरपाई मागितली आहे. हे वाचा -  Wedding cake मुळे चढला नवरीबाईचा पारा; लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच मागितला घटस्फोट व्यावसायिकाने कोर्टात आपले डीएनए सॅम्पल देण्यासही नकार दिला. उलट आपलं स्पर्म चोरी झाल्याचं सांगितलं. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. अद्याप या प्रकरणाचा काहीही निकाल लागलेला नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात