जाहिरात
मराठी बातम्या / विदेश / ISIS प्रमुख अबू हुसैन अल-कुरेशी ठार, तुर्कीच्या राष्ट्राध्यक्षांचा मोठा दावा

ISIS प्रमुख अबू हुसैन अल-कुरेशी ठार, तुर्कीच्या राष्ट्राध्यक्षांचा मोठा दावा

ISIS

ISIS

तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगन यांनी मोठा दावा केला.

  • -MIN READ International
  • Last Updated :

अंकारा, 1 मे : इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेच्या (ISIS) प्रमुखाबाबत तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगन यांनी मोठी घोषणा केली आहे. सीरियामध्ये इसिसचा प्रमुख अबू हुसेन अल-कुरेशी मारला गेल्याची घोषणा एर्दोगन यांनी रविवारी केली. एर्दोगन म्हणाले की, त्यांची राष्ट्रीय गुप्तचर संस्था दाएश ISIS च्या तथाकथित नेत्याला फॉलो करत होती. त्याचे एक कोडनेम अबू हुसैन अल-कुरेशी आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, ते पुढे म्हणाले, ‘मी येथे पहिल्यांदाच असे म्हणत आहे. एमआयटीने केलेल्या कारवाईत काल अबू हुसैन अल-कुरेशी याचा मृत्यू झाला. तुर्की कोणताही भेदभाव न करता दहशतवादी संघटनांविरुद्ध आपला संघर्ष सुरूच ठेवणार आहे. दरम्यान, अनादोलु एजन्सीनुसार, 2013 मध्ये तुर्की दाएश ISIS ला दहशतवादी संघटना घोषित करणारा पहिला देश बनला होता. तेव्हापासून देशावर अनेकवेळा दहशतवादी गटाकडून हल्ले झाले आहेत. किमान 10 आत्मघाती बॉम्बस्फोट, सात बॉम्ब हल्ले आणि चार सशस्त्र हल्ल्यांमध्ये 300 हून अधिक लोक मारले गेले आणि शेकडो लोक जखमी झाले. प्रत्युत्तर म्हणून तुर्कीने पुढील हल्ले रोखण्यासाठी देश-विदेशात दहशतवादविरोधी मोहीम सुरू केली. हेही वाचा -  केंद्र सरकारची मोठी कारवाई, पाकिस्तानला माहिती देणारे आणखी 14 App Block एका मुलाखतीत तुर्कीच्या राष्ट्रपतींनी असेही सांगितले की, पाश्चिमात्य देशांमध्ये वर्णद्वेष, इस्लामोफोबिया आणि भेदभाव कर्करोगाच्या पेशींप्रमाणे पसरत आहेत. या धोक्याचा सामना करण्यासाठी पाश्चात्य देशांनी अद्याप प्रयत्न दाखवलेले नाहीत. परदेशात मुस्लिम आणि मशिदींना लक्ष्य करणारे द्वेषयुक्त भाषण आणि हल्लेदेखील वाढत आहेत. एर्दोगन म्हणाले, “मशिदींवरील जाळपोळ आणि वर्णद्वेषी गटांकडून पवित्र कुराण फाडणे यासारख्या घृणास्पद कृत्यांमध्येही वाढ झाली आहे.” आमच्या नागरिकांच्या जीवनाची आणि मालमत्तेची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी आम्ही प्रत्येक पावले उचलू. अलीकडच्या काही महिन्यांत उत्तर युरोप आणि नॉर्डिक देशांमध्ये इस्लामोफोबिक व्यक्तिमत्त्वे किंवा गटांकडून कुराण जाळणे किंवा तसे करणे अशा अनेक कृत्ये घडली आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: ISIS
  • First Published :
जाहिरात
जाहिरात