जाहिरात
मराठी बातम्या / देश / केंद्र सरकारची मोठी कारवाई, पाकिस्तानला माहिती देणारे आणखी 14 App Block

केंद्र सरकारची मोठी कारवाई, पाकिस्तानला माहिती देणारे आणखी 14 App Block

केंद्र सरकारची मोठी कारवाई, पाकिस्तानला माहिती देणारे आणखी 14 App Block

जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी गटांकडून वापरण्यात येणारे १४ मेसेंजर मोबाइल अॅप्लिकेशन्स ब्लॉक केले आहेत.

  • -MIN READ Jammu,Jammu,Jammu and Kashmir
  • Last Updated :

नवी दिल्ली : केंद्र सरकारने पुन्हा एकदा मोठी कारवाई केली आहे. 14 अॅप सध्या बंद करण्यात आले आहेत. जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी गटांकडून वापरण्यात येणारे १४ मेसेंजर मोबाइल अॅप्लिकेशन्स ब्लॉक केले आहेत. Cripwiser, Enigma, SafeSwiss, Vikrame, Mediafire, Briar, Beechat, Nandbox, Conion, IMO, Element, Second Line, Jangi, Threema अशा अॅपचा यामध्ये समावेश असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. अनेक एजन्सींना याबाबत माहिती मिळाली, हे App दहशतवादी संघटनेतील लोक काश्मीर खोऱ्यातील ऑन-ग्राउंड वर्कर्स (OGWs) सोबत संवाद साधण्याचं माध्यम म्हणून वापरत आहेत. मात्र ह्या App ला भारतात परवानगी नाही. भारतीय कायद्यानुसार माहिती मिळविण्यासाठी संपर्क साधता येत नाही. एजन्सींनी अनेक वेळा अॅप व्यवस्थापनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला.

News18लोकमत
News18लोकमत
जाहिरात

यापैकी बहुतेक अॅप्स युजर्स हे वेगळ्या नावाने होते. याशिवाय त्याचं डिझाइन देखील वेगळं होतं ज्यामुळे युजर्सपर्यंत पोहोचण्यात अनेक आव्हानं येत आहेत. त्यामुळेच या अॅपला अखेर बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

कर्नाटकात PM मोदींच्या सुरक्षेत मोठी चूक, महिलेने फेकला मोबाईल; VIDEO VIRAL

 भारतात हे अॅप चालू शकणार नाहीत. त्यामुळे भारतातील माहिती शत्रू देशांपर्यंत पोहोचू शकणार नाही. याच कारणासाठी केंद्र सरकारने या अॅपला बंद केलं आहे. दहशतवादी विरोधी कारवाईत सहभागी असलेल्या एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.

विमानाच्या कॉकपिटमध्ये गर्लफ्रेंड : DGCA ची मोठी कारवाई, थेट Air India च्या CEO आणि फ्लाइट सेफ्टी हेडला पाठवली नोटिस

सुरक्षा दल आणि तपास यंत्रणांना हे अॅप्स ऑपरेशनमध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांकडून जप्त केलेल्या मोबाइल फोनवर डाउनलोड केलेले आढळले आहेत. अटक केलेल्या अनेक OGW च्या फोनवर यापैकी किमान एक अॅप होते. त्याचवेळी तपासादरम्यान हे अॅप्स पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटनांचा अजेंडा वाढवण्यासाठी वापरण्यात येत असल्याचेही आढळून आले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात