मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

भारताला सावधानतेचा इशारा, पाक-तुर्कीच्या मैत्रीमुळे काश्मीरला धोक्याचे संकेत

भारताला सावधानतेचा इशारा, पाक-तुर्कीच्या मैत्रीमुळे काश्मीरला धोक्याचे संकेत

काश्मीरबाबत पाकिस्तान आणि तुर्की यांच्यातील मैत्रीबद्दल ग्रीसच्या मीडियाने भारताला इशारा दिला आहे.

काश्मीरबाबत पाकिस्तान आणि तुर्की यांच्यातील मैत्रीबद्दल ग्रीसच्या मीडियाने भारताला इशारा दिला आहे.

काश्मीरबाबत पाकिस्तान आणि तुर्की यांच्यातील मैत्रीबद्दल ग्रीसच्या मीडियाने भारताला इशारा दिला आहे.

अंकारा, 13 फेब्रुवारी : काश्मीर (Kashmir) मुद्द्यावरून पाकिस्तान (Pakistan) आणि तुर्की  (Turkey) यांच्यातील मैत्रीचे संबंध दृढ होताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर, ग्रीसमधील (Greece) एका माध्यमाने भारताला सावधगिरीचा इशारा दिला आहे. ग्रीसमधल्या पेंटापोस्टाग्मा या वेबसाइटवर असा दावा करण्यात आला आहे, की पाकिस्तानला मदत करण्यासाठी तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसीप तय्यप अर्दोगान (Recep Tayyip Erdogan) काश्मीरमध्ये भाडोत्री दहशतवादी पाठवून हिंसा (Terrorism) घडवून आणू शकतात. त्यासाठी अर्दोगान यांच्या एका सैन्यविषयक सल्लागाराने  काश्मीर मुद्द्यावरून, अमेरिकेत सक्रिय असलेल्या एका दहशतवादी संघटनेच्या प्रमुखाची मदतही घेतल्याचा दावा करण्यात आला आहे. पेंटापोस्टाग्मा या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, तुर्कीने पोसलेल्या अतिरेक्यांची सादात ही संघटना आता काश्मीरमध्ये सक्रिय होण्याची तयारी करत आहे. खरं तर, तुर्की हा देश स्वतःला मध्य आशियातला आघाडीचा शक्तिशाली देश म्हणून पाहू इच्छितो. त्यामुळे तो पाकिस्तानशी हातमिळवणी करून काश्मिरात हिंसा पसरवण्याचा कट रचतो आहे.

 हे देखील वाचा -    नरेंद्र मोदींच्या दाढीला पाकिस्तान खरंच घाबरला का? नेमकं काय आहे प्रकरण? पाहा व्हायरल VIDEO

तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसीप तय्यप अर्दोगान यांनी ही जबाबदारी सादात या दहशतवादी संघटनेकडे सोपवली आहे, असा दावा त्या वृत्तात करण्यात आला आहे. अर्दोगान यांचे सैन्यविषयक सल्लागार अदनान तनरिवर्दी सादातचे नेतृत्व करतो. अदनानने काश्मीरमध्ये संघटनेचा तळ तयार करण्यासाठी काश्मीरमध्येच जन्मलेल्या सय्यद गुलाम नबी फई या नावाच्या दहशतवाद्याला नियुक्त केलं आहे. आयएसआय या पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेच्या पैशांनी भारताविरोधात भाडोत्री दहशतवाद्यांची भरती करण्याकरिता, तसंच टॅक्सचोरी केली म्हणून अमेरिकेच्या तुरुंगात दोन वर्षांची सजा भोगून आला आहे. सय्यद गुलाम नबी फई कोण आहे? सय्यद गुलाम नबी फईचा जन्म जम्मू-काश्मीरात बडगाम येथे एप्रिल 1949मध्ये झाला. जमात ए  इस्लामी या कट्टरपंथी संघटनेचाही तो सक्रिय सदस्य होता. फईने अमेरिकेत काश्मीरविरोधात कट रचण्यासाठी अमेरिकी कौन्सिल ऑफ काश्मीर या संघटनेची स्थापना केली होती. या संस्थेला पाकिस्तानची आयएसआय ही गुप्तचर संघटना निधी पुरवते. एफबीआय या अमेरिकेच्या गुप्तचर संघटनेनेही या गोष्टीला दुजोरा दिला आहे. पेंटापोस्टाग्मा या वेबसाइटवरच्या बातमीत लिहिलं आहे, की काश्मिरात हिंसा घडवण्याच्या दृष्टीने सय्यद गुलाम नबी फई आजही सक्रिय आहे. सादातच्या कार्यक्रमांमध्ये तो सहभागी होतो. अदनान तनरिवर्दीचीही भेट त्याने घेतली आहे. हे दोघे मिळून काश्मिरात काही तरी हिंसक घडवण्यासंदर्भातलं षड्यंत्र रचत आहेत, असा दावा त्यात करण्यात आला आहे.
Published by:news18 desk
First published:

Tags: Jammu and kashmir, Pakistan, Terrorism, Turkey, Violence

पुढील बातम्या