विमानात 6 परदेशी नागरिक होते. तसेच, एक डोमिनिकन होता. Flightradar 24 नुसार, विमान डोमिनिकन रिपब्लिकमधील ला इसाबेला आंतरराष्ट्रीय विमानतळावरून फ्लोरिडाला जात होतं. यादरम्यान आपत्कालीन लँडिंग करण्यात आलं. उड्डाणानंतर अवघ्या 15 मिनिटांतच विमान कोसळलं. डिसेंबरमध्ये कोसळलं भारतीय हवाई दलाचे MI17V5 हेलिकॉप्टर गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये भारतीय हवाई दलाचे Mi17V5 हेलिकॉप्टर भारतात कोसळलं होतं. या अपघातात सीडीएस जनरल बिपिन रावत, त्यांची पत्नी मधुलिका रावत आणि ब्रिगेडियर एलएस लिडर यांच्यासह 13 जणांचा मृत्यू झाला. अपघाताच्या एका दिवसानंतर 9 डिसेंबर रोजी सर्व मृतदेह तामिळनाडूतील सुलूर येथून दिल्लीत आणण्यात आले. या अपघातातून बचावलेले ग्रुप कॅप्टन वरुण सिंग यांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याचदरम्यान ऑक्टोबरमध्ये, इटलीच्या रोम येथे स्थित मिलानच्या उपनगरात एका रिकाम्या दोन मजली इमारतीला आदळल्यानंतर एक लहान विमान कोसळलं. एका इटालियन वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात विमानातील सर्व 6 प्रवासी आणि दोन क्रू मेंबर्सचा मृत्यू झाला आहे. 'लाप्रेस' या वृत्तसंस्थेनं घटनास्थळी उपस्थित अग्निशमन दलाच्या जवानांच्या हवाल्याने सांगितलं की, विमानातील पायलट आणि पाच प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. मिलानजवळील लहान शहर सॅन डोनाटो मिलानीजच्या सबवे स्टेशनजवळ विमान कोसळलं.Seven dead as tourist plane crashes near Peru's Nazca lines: AFP News Agency quoting Ministry
— ANI (@ANI) February 4, 2022
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Airplane, Death, Domestic flight, International, Travel by flight