कोरोना योद्ध्यावर काळाचा घाला, रुग्णालयात नेण्यापूर्वीच सोडले प्राण

कोरोना योद्ध्यावर काळाचा घाला, रुग्णालयात नेण्यापूर्वीच सोडले प्राण

कोरोना योद्ध्यांच्या निधनामुळे भागात शोककळा पसरली आहे

  • Share this:

रोहतास, 30 एप्रिल : सध्या देशभरात हजारो कोरोना (Corona Warriors) योद्धा दिवस-रात्र ड्युटीवर तैनात आहे. कोरोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव वाढू नये यासाठी लॉकडाऊनचे पालन होणं आवश्यक आहे. यासाठी हे कोरोना योद्धा प्रतिकूल परिस्थितीत निष्ठेने, न डगमगता आपलं काम करीत आहेत. दरम्यान गुरुवारची सकाळी रोहतास जिल्ह्यात शोककळा पसरली. जेव्हा राजपुराअंतर्गत धर्मपुरा पोलीस  ठाण्याचे प्रमुख (SHO) ऋषिकेश सिंह यांचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. गेल्या 1 महिन्यांपासून ऋषिकेश हे सलग लॉकडाऊनच्या ड्यूटीवर होते. यादरम्यान त्यांची तब्येत बरी नव्हती. मात्र तरीही ते आपल्या कर्तव्यावर तैनात होते. मात्र बुधवारी रात्री ह्रदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला.

यापूर्वी दोन वेळा आला होता हार्टअटॅक

मिळालेल्या माहितीनुसार भोजपूरातील पचगावमधील त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले की, गेल्या अनेक महिन्यांपासून ऋषिकेश सिंह यांची तब्येत बरी नव्हती. यापूर्वी दोन वेळा त्यांना हार्टअटॅक आला आहे. बुधवारी रात्री ते घरी आले. दूरदर्शनवर रामायण मालिका पाहिली. त्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागलं. पोलीस कर्मचाऱ्यांनी  तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सहकारी पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांचा मृतदेह काही वैद्यकीय  प्रक्रियेनंतर कुटुंबीयांकडे सुपूर्द केला. ऋषिकेश हे 55 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी आहे. ऋषिकेश अत्यंत कर्तव्यनिष्ठ होते. ते पोलीस दलात रुजू झाले तेव्हा ते जवान होते. त्यानंतर प्रामाणिकपणा आणि कामाच्या जोरावर ते ठाणे प्रमुखाच्या पदापर्यंत पोहोचले.

संबंधित -घरी जाण्यासाठी परप्रांतीयांना पाळावे लागतील 'हे' नियम, सरकारने केले जाहीर

12 तासांत 51 कोरोना रुग्ण, तीर्थयात्रा करुन गेलेल्या भाविकांमुळे वाढली संख्या

 

First published: April 30, 2020, 7:48 PM IST

ताज्या बातम्या