बँकॉक 13 एप्रिल: सर्व जग सध्या कोरोनाविरुद्ध लढत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी जगभर संशोधन करण्यात येत आहे. पण त्यावर रामबाण उपाय सापडलेला नाही. कोरोना पेशंटला हाताळणं ही अतिशय जोखमीची बाब असते. तर कोरोनाची लागण होऊ नये म्हणून उपाय योजना करणं हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. त्यात गर्भवती महिला आणि नवजात बाळांना खूप जपावं लागतं. अशा बाळांना कोरोनाची लागण होऊ नये म्हणून थायलंडमध्ये एका खास किट तयार करण्यात आली आहे. अतिशय उच्च दर्जा असलेल्या प्लॅस्टिकच्या शिटपासून एक फेस हेल्मेट तयार करण्यात आलं असून ते बाळाला लावलं जातं. त्यामुळे त्याच्या चेहेऱ्याचं इन्फेक्शनपासून संरक्षण होतं. सर्दी, खोकला, किंवा तोंडावाटे जे तुषार बाहेर पडतात त्यातून कोरोनाचा प्रसार सर्वाधिक झापाट्याने होतो. त्यामुळे या सुरक्षा किटमुळे त्याचं संरक्षण होतं. थायलंडमधल्या अनेक हॉस्पिटल्सनी याची मागणी नोंदवली आहे. कोरोनाव्हायरसने चीनमधून चार महिन्यांपूर्वी जगात प्रवेश केला. या धोकादायक विषाणूमुळे आतापर्यंत एक लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 18 लाख लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. मात्र अद्याप कोणत्याही देशाला या विषाणूवर लस शोधता आलेली नाही. ‘आम्हाला वाचवा नाहीतर…’, पाकचे पंतप्रधान इमरान खान यांनी जगासमोर मागितली भीक लस तयार करण्यासाठी सुमारे 50 देशांमध्ये संशोधन चालू आहे. दरम्यान, इस्रायलने कोरोना विषाणूची लस तयार केली आहे. येत्या 90 दिवसांत कोरोनाशी लढा देण्यासाठी त्यांचे वैज्ञानिक लस पूर्णपणे तयार करतील असा दावा त्यांनी केला आहे. वेदनेनं किंचाळत असलेल्या गर्भवती महिलेकडे दुर्लक्ष, उभ्याने दिला बाळाला जन्म इस्त्रायलमधील टेलीग्राम चॅनेलने दिलेल्या वृत्तानुसार, 90 दिवसात ही लस तयार होणार आहे. येथील विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्र्यांच्या म्हणण्यानुसार ओफिर अकुनिस यांनी दावा केला आहे की, कोरोना दूर करण्यासाठी 90 दिवसांच्या आत लस तयार करेल. त्यांच्या मते ही एक अतिशय अनोखी आणि प्रभावी लस आहे.
Watch: Several Thai hospitals are providing tiny face shields to protect newborn babies from the coronavirus pic.twitter.com/6PCZr998un
— TIME (@TIME) April 13, 2020
मिगेल गॅलेली रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ इस्त्रायलच्या शास्त्रज्ञांचेही मंत्री यांनी अभिनंदन केले. लवकरच ही लस वापरली जाईल आणि नंतर ती इतर देशांना दिली जाईल.

)







