वॉशिंगटन 20 मे: अमेरिकेत एका भारतीयाला (American Indian) 56 महिन्यांची शिक्षा सुनावली गेली आहे. इतकंच नाही तर ही शिक्षा पूर्ण झाल्यानंतर त्याला भारतात (India) परत पाठवलं जाणार आहे. 32 वर्षीय सुनील अकुला याला टेक्सास स्थित न्यायालयानं आपल्या पत्नीचा छळ, तिचं अपहरण आणि पाठलाग केल्याप्रकरणी गुन्हेगार (Criminal) घोषित केलं आहे. न्यायालयानं सुनीलला 56 महिन्यांची शिक्षा सुनावली आहे. यासोबतच तीन वर्ष त्याच्यावर नजर ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे. सुनील अकुलावर (Sunil K Akula) पाठलाग करणे, अपहरण आणि न्याय प्रक्रियेत बाधा आणल्याचा आरोप आहे. वकीलांनी सांगितलं, की अकुला 6 ऑगस्ट 2019 रोजी टेक्सास स्थित आपल्या घरातून मेसाच्युसेट्स येथे गेला होता. जिथे त्याने आपल्या पत्नीवर अत्याचार केले. अकुला आणि त्याची पत्नी विभक्त झाले होते. वकिलांनी सांगितलं, की अकुलानं जबरदस्तीनं आपल्या पत्नीला तिच्या अपार्टमेंटमधून बाहेर काढलं आणि तिला कारमध्ये घेऊन गेला. त्यानं आपल्या पत्नीला टेक्सास सोडत असल्याचं सांगितलं, परंतु बर्याच राज्यात ते फिरत राहिले. सुनीलनं कारमध्येदेखील आपल्या पत्नीसोबत चुकीचं कृत्य केलं. त्यानं आपल्या पत्नीला तिच्या कंपनीत राजीनाम्याचा मेल पाठवण्यास सांगितलं. असं न केल्यानं रागात त्यानं पत्नीचा लॅपटॉप तोडला. इतकंच नाही तर त्यानं आपल्या पत्नीला मारहाण केली आणि कारमधून धक्का देत हाईवेवर टाकलं. यानंतर पुन्हा त्यानं पत्नीला जबरदस्तीनं कारमध्ये बसवलं आणि हॉटेलमध्ये घेऊन गेला. वकीलांनी असा आरोप केला, की सुनीलनं हॉटेलमध्येही पत्नीला मारहाण केली आणि तिला हॉटेलमधून बाहेर काढलं. महिलेच्या तक्रारीनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि सुनीलला अटक केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.