मराठी बातम्या /बातम्या /विदेश /कधी काठी पकडते तर कधी छत्री; तरुणी कानासोबत करते बरेच प्रयोग; Video पाहिला का?

कधी काठी पकडते तर कधी छत्री; तरुणी कानासोबत करते बरेच प्रयोग; Video पाहिला का?

सध्या या जपानी महिलेनं (Japanese Women) इंटरनेटवर खळबळ उडवली आहे.

सध्या या जपानी महिलेनं (Japanese Women) इंटरनेटवर खळबळ उडवली आहे.

सध्या या जपानी महिलेनं (Japanese Women) इंटरनेटवर खळबळ उडवली आहे.

    नवी दिल्ली, 17 मे : आपल्या आजूबाजूला काही वस्तू (Objects), व्यक्ती (Person) किंवा काही घटना (Events) इतक्या विचित्र (Strange) असतात, की त्यांच्याबद्दल समजल्यानंतर आपल्याला आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. इंटरनेटच्या (Internet) वापरामुळे तर जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यातल्या आश्चर्यकारक बाबी (Amazing Things) सहज आपल्यापर्यंत पोहोचतात. सध्या एका जपानी महिलेनं (Japanese Women) इंटरनेटवर खळबळ उडवली आहे.

    महिलांचं शरीर पुरुषांच्या तुलनेत जास्त लवचिक (Flexible) असतं, असं म्हटलं जातं. असं असलं तरी महिलांच्या शरीराच्या लवचिकतेलाही एक मर्यादा आहे; मात्र टोकियोतल्या आयुमी ताकाडा (Ayumi Takada) नावाच्या या महिलेनं ही मर्यादाच मोडीत काढली आहे. आयुमीचे कान (Ears) इतके लवचिक आणि अनोखे आहेत, की त्यामुळे ती जगभर प्रसिद्ध झाली आहे. छत्री (Umbrella) अडकवण्यासाठी किंवा सेल्फी स्टिक (Selfie Stick) पकडण्यासाठी ती हातांऐवजी आपल्या कानांचा वापर करू शकते. तिच्या या क्षमतेमुळे तिची तुलना 'द इनक्रेडिबल्स' (The Incredibles) चित्रपटातल्या 'इलास्टी गर्ल'शी (Elastigirl) केली जात आहे. 'आज तक'ने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

    जपानच्या राजधानीचं शहर असलेल्या टोकियोमध्ये राहत असलेली 37 वर्षांची आयुमी ताकाडा सध्या इंटरनेटरवर चर्चेचा विषय ठरली आहे. आयुमीचा एक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. त्यामध्ये ती आपल्या कानामध्ये सेल्फी स्टिक, छत्री आणि पेन अडकवताना दिसत आहे. ही विचित्र घटना पाहून सर्व जण आश्चर्यचकित झाले आहेत. आयुमीचा कान 4.5 सेमीपर्यंत लांब होऊ शकतो आणि सेल्फी स्टिकच्या हँडलभोवती सहज गुंडाळला जाऊ शकतो. एका व्हिडिओ फुटेजमध्ये असं दिसतंय, की आयुमी आपल्या कानाचा वापर करून पावसात डोक्यावर छत्री धरते आणि मोकळ्या असलेल्या दोन्ही हात शॉपिंग बॅग्ज (Shopping Bags) पकडते.

    " isDesktop="true" id="703634" >

    अंगी असा विचित्र गुण असलेल्या आयुमीच्या काही व्हिडिओजना आतापर्यंत 50 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तिच्या अंगातल्या विचित्र कौशल्यामुळेच तिची तुलना 'द इनक्रेडिबल्स' या कार्टूनमधल्या 'इलास्टीगर्ल'सोबत केली जात आहे.

    आयुमीनं दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक शाळेत (Primary School) असताना तिला पहिल्यांदा तिच्या कानाचे लोब्ज (Ear Lobe) लवचिक आहेत, याची जाणीव झाली होती. त्या दिवशी पाऊस पडत होता आणि तिचे हात भिजले होते. म्हणून तिनं कानाच्या मदतीनं छत्री पकडण्याचा प्रयत्न केला होता. आश्चर्याची गोष्ट म्हणजे अगदी सहजपणे छत्री तिच्या कानात अडकली. तेव्हापासून ती सेल्फी स्टिक, ब्रश, छत्री, सफाईचं उपकरण आणि हँगर अशा विविध गोष्टी पकडण्यासाठी कानाचा वापर करते.

    First published:

    Tags: Ear, Japan