नवी दिल्ली, 17 फेब्रुवारी : 6 महिन्यांनंतर बाळांना अन्न देण्यास सुरुवात केली जाते. मात्र बाळांच्या नाजूक लिव्हरला काय काय द्यायला हवं, हे जाणणं गरजेचं आहे. सर्वसाधारणपणे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, 6 महिन्यांपर्यंत बाळ केवळ आईचं दूध पितं. मात्र 6 महिन्यांनंतर त्याला सर्वसाधारण अन्नपदार्थ देण्यास सुरुवात केली जाते. भारतात डाळीचं पाणी, खिचडी आदी पचायला हलकं अन्न दिलं जातं.
मात्र केटी हार्ले (Katie Harley) हिने आपल्या 6 महिन्यांच्या मुलीला कच्च मांस खायला दिलं. आणि ते गोंडस बाळही मांस आनंदाने खात आहे. यावरुन सोशल मीडियावर वाद सुरू झाला आहे.
टिकटॉक स्टार (Tiktok) केटी हार्ले (Katie Harley) हिने हा व्हिडीओ शेअर केला आहे. यावरुन लोकांनी नाराजी व्यक्त केली आहे. केटीने अपनी 6 महिन्यांच्या मुलीला मांसाचा तुकडा खायला दिला आहे. (Girl was shown eating a piece of meat in her hand). लोकांनी यावर संताप व्यक्त केला. इतक्या लहान मुलीला मांस खाऊ घालणं, तेही न शिजवलेलं..हे तिच्या प्रकृतीसाठी योग्य नाही. लहान मुलांना असं असे पदार्थ देणे योग्य नसल्याचं त्यांनी सांगितलं.
हे ही वाचा-दुसऱ्याचा जीव वाचवायला मूत्रपिंड केलं दान, घरी पोहोचलं तब्बल 10 लाखांचं बिलसोशल मीडियावर सुरूये वाद...
टिकटॉकवर हा व्हिडीओ अपलोड केल्यानंतर हा तब्बल 2 लाख वेळा पाहिला गेला आहे. व्हिडीओवर अनेकांनी कमेंट केली आहे. अनेकांना वाटतं की, 6 महिन्याच्या मुलीला असं अन्न देणं चुकीचं आहे. ही बाब मांसाहारी किंवा शाकाहाराची नसून कच्च मांस मोठ्या व्यक्तींसाठीही अयोग्य असतं.
त्यात 6 महिन्याच्या मुलीला त्याचा त्रास होऊ शकतो, असं सांगितलं जात आहे.
Published by:Meenal Gangurde
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.