Organ Donor Gets Huge Hospital Bill : जगात प्रत्येक समस्येचं समाधान असतं आणि माणसं ते शोधूनही काढतात. मात्र वैद्यकीय आपात्कालिन परिस्थितीत अनेकदा प्रयत्नही कमी पडतात. कोरोना काळात सर्वांनीच याचा अनुभव घेतला. दुसरीकडे शरीरातील एखादा अवयव निकामी झाला तर डोनर (Organ Donor) शोधणं मोठं कठीण काम असतं. अमेरिकेत (United States News) एका व्यक्तीने कोणी अगदी देवासारखा येऊन त्याला स्वत:ची किडनी दिली.(Kidney Donation) . यामुळे समोरच्याचं आय़ुष्य तर सुधारणं मात्र या बदल्यात त्या दात्याला जे काही अनुभवावं लागलं ते भयंकर आहे. अमेरिकेत राहणारा इलियट मैलिन (Elliot Malin) याने आपल्या नातेवाईकांमधील एकासाठी किडनी डोनेट केली आहे. तिने बराच विचार करून हा निर्णय घेतला. मात्र किडनी डोनेट केल्यानंतर ऑपरेशनसह रिकवरीचं बिलही दात्याच्याच हातात दिलं. 28 वर्षांचा स्कॉट क्लाइनला इलियट मैलिन (Elliot Malin) याने किडनीचं दान केलं. त्यांच्यावर 2021 मध्ये शस्त्रक्रिया झाली होती. टेक्सासच्या Baylor Scott & White All Saints Medical Center मध्ये शस्त्रक्रिया केल्यानंतर स्कॉट आणि इलियट दोघांची प्रकृती चांगली होती. यादरम्यान मैलिनला एक मोठ्या रकमेचं बिल देण्यात आलं. ज्यात किडनी डोनेशर व्यतिरिक्त स्कॉट क्लाइटची रिकवरीचा खर्च जोडण्यात आला होता. हे बिल साधारण 10 लाख रुपयांचं होतं. हे ही वाचा- Wi-Fi साठी आई-वडिलांसह भावावर गोळीबार; 3 दिवस मृतदेहांसोबत राहिला मुलगा अन्… ऑर्गन डोनरकडून घेतले जात नाहीत पैसे… नियमानुसारस अवयन दान करणाऱ्या व्यक्तीकडून पैसे घेतले जात नाही. हा सर्व खर्च ज्याला अवयव मिळाला त्याच्याकडून करणं अपेक्षित असतं. मात्र मॅलिनला 10 लाखांचं बिल मिळाल्यानंतर त्याला धक्काच बसला. त्याने याबाबत चौकशी केल्यानंतर कंपनीच्या बिलिंग विभागाच्या चुकीमुळे हा सर्व प्रकार घडला. जेव्हा कंपनीला हे लक्षात आलं तर त्यांनी मॅलिनला माफीचा मेल पाठवला. यात त्यांनी 10 लाखांच्या बिलासाठी माफी मागितली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.