मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

ही आहे जगातील सर्वात जुनी व्हिस्कीची बाटली; जूनमध्ये होणार लिलाव, किंमत वाचून बसेल धक्का!

ही आहे जगातील सर्वात जुनी व्हिस्कीची बाटली; जूनमध्ये होणार लिलाव, किंमत वाचून बसेल धक्का!

ही व्हिस्कीची बाटली इसवीसन 1762 ते 1802च्या दरम्यान जॉर्जियाच्या (Georgia) लाग्रांजमध्ये तयार करण्यात आली असल्याचा दावा केला जात आहे.

ही व्हिस्कीची बाटली इसवीसन 1762 ते 1802च्या दरम्यान जॉर्जियाच्या (Georgia) लाग्रांजमध्ये तयार करण्यात आली असल्याचा दावा केला जात आहे.

ही व्हिस्कीची बाटली इसवीसन 1762 ते 1802च्या दरम्यान जॉर्जियाच्या (Georgia) लाग्रांजमध्ये तयार करण्यात आली असल्याचा दावा केला जात आहे.

जगातील सर्वांत जुन्या व्हिस्कीच्या बाटलीचा (World’s Oldest Whiskey Bottle) येत्या जून महिन्यामध्ये अमेरिकेच्या (USA) मॅसेच्युएसेट्स प्रांताची राजधानी असलेल्या बोस्टनमध्ये (Boston) लिलाव (Auction) होणार आहे. या बाटलीसाठी तब्बल 40 हजार डॉलर्सपर्यंतची बोली लागू शकते अशा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

ही व्हिस्कीची बाटली इसवीसन 1762 ते 1802च्या दरम्यान जॉर्जियाच्या (Georgia) लाग्रांजमध्ये तयार करण्यात आली असल्याचा दावा या बाटलीचा लिलाव आयोजित करणाऱ्या स्किनर ऑक्शनिअर्सनं (Skinner Auctioneers) कंपनीनं केला आहे. जवळपास 220 ते 250 वर्षांपूर्वीच्या व्हिस्कीची ही दुर्मीळ बाटली आहे.

‘1860मध्ये इव्हान्स अँड रॅग्लँड यांच्यातर्फे जीए लांग्रेजमध्ये तयार करण्यात आलेली ‘ओल्ड इंग्लल्ड्यू व्हिस्की’ची बाटली बाटली ही सर्वांत जुन्या व्हिस्कीची अस्तित्वात असलेली एकमेव बाटली मानली जाते. 1940च्या दशकात जेपी मॉर्गनच्या तळघरात असलेली ही बाटली वॉशिंग्टन पॉवर एलिटला(वॉशिंग्टन सर्वोच्च व्यक्तीला) भेट देण्यात आली होती,’अशी माहिती ‘स्किनर’चे रेअर स्पिरिट्स तज्ज्ञ जोसेफ हायमन यांनी गेल्या आठवड्यात लिहिलेल्या कंपनीच्या ब्लॉगमध्ये दिली आहे.

हे ही वाचा-एक रुपयाचं हे दुर्मिळ नाणं तुमच्याकडे आहे का?; असेल तर तुम्ही होऊ शकता कोट्यधीश

जॉर्जिया विद्यापीठाच्या (Georgia University) सहकार्यानं 2021मध्ये करण्यात आलेल्या कार्बन 14 डेटिंगनुसार, या व्हिस्कीची निर्मिती 1762 ते 1802 दरम्यान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यांनतर ग्लासगो युनिव्हर्सिटीनं या बाबतीतल्या माहितीचे मूल्यांकन करून ही व्हिस्कीची बाटली 1763 ते 1803 दरम्यान तयार करण्यात आल्याचा 81 टक्के अंदाज वर्तवला. यामुळे या बाटलीला 1770ची क्रांतिकारी लढाई आणि 1790चा व्हिस्कीच्या विश्वातील बंडखोरीचा ऐतिहासिक संदर्भ आहे,असं ‘स्किनर’ कंपनीनं म्हटलं आहे.

ब्रिटनमध्ये (UK) आयोजित करण्यात आलेल्या शंभर वर्षापूर्वीच्या व्हिस्की संग्रहाच्या (Whisky Collection) लिलावात (Auction) व्हिस्कीच्या एका बाटलीला(Whisky Bottle)तब्बल दहा लाख डॉलर्स म्हणजे 7 कोटी रुपये अशी प्रचंड किंमत मिळाली होती. दुर्मीळ व्हिस्कीच्या बाटलीला आतापर्यंत मिळालेली ही सर्वाधिक किंमत आहे. मॅकलन(Macallan)डिस्टिलरी कंपनीनं 1926 मध्ये म्हणजे जवळपास 100 वर्षांपूर्वी बनवलेली ही व्हिस्की जगातील सर्वात दुर्मीळ अशा 14 दारुंच्या प्रकारांपैकी एक आहे. त्याचप्रमाणे 3900 सिंगल माल्टसच्या(Single Malt)संग्रहाला तब्बल 6.7 दशलक्ष डॉलर्स इतकी प्रचंड किंमत मिळाली. प्रथमच एका खासगी संग्रहाला अशी सहा आकडी किंमत मिळाली. आता त्याहून अधिक जुन्या व्हिस्कीच्या बाटलीच्या लिलावाकडे सगळ्या जगाचे लक्ष लागले आहे.

First published:

Tags: England, Liquor stock, Whisky