एक रुपयाचं हे दुर्मिळ नाणं तुमच्याकडे आहे का?; असेल तर तुम्ही होऊ शकता कोट्यधीश

एक रुपयाचं हे दुर्मिळ नाणं तुमच्याकडे आहे का?; असेल तर तुम्ही होऊ शकता कोट्यधीश

या दुर्मिळ नाण्याला सध्या दहा कोटी रुपयांपर्यंतची किंमत मिळत आहे. तेव्हा बघा तुमच्या संग्रहात आहे का हे दुर्मिळ नाणं, जे तुम्हाला घरबसल्या करेल कोट्याधीश.

  • Share this:

मुंबई 30 एप्रिल: सध्याच्या कोरोना काळात (Corona Pandemic)अनेकांचं उत्पन्नाचं साधन गेलं आहे,काहींचं उत्पन्न घटलं आहे. त्यात महागाईचा(Inflation)फटका आहेच. अशा परिस्थितीत फक्त एक नाणं(Coin)तुम्हाला घरबसल्या कोट्यधीश होण्याची संधी मिळवून देऊ शकतं. हे नाणं आहे एक रुपयाचं एक विशिष्ट नाणं. या दुर्मिळ नाण्याला सध्या दहा कोटी रुपयांपर्यंतची किंमत मिळत आहे. तेव्हा बघा तुमच्या संग्रहात आहे का हे दुर्मिळ नाणं, जे तुम्हाला घरबसल्या करेल कोट्याधीश.

या दुर्मीळ नाण्याची किंमत आहे दहा कोटी रुपये :

सध्या एक रुपयाच्या एका दुर्मीळ नाण्याला लिलावात साधारणपणे दहा कोटी रुपयांपर्यंतची किंमत मिळत आहे. हे 1885 मधील इंग्रजांच्या काळातील(British Rule)नाणं असून,यावर इसवी सन 1885 असं लिहिलेलं असणं अपेक्षित आहे. तुमच्याकडं असं नाणं असेल तर ते ऑनलाइन लिलावासाठी(Online Auction)टाकता येईलआणि ऑनलाइन विक्रीत 9 कोटी 99 लाख रुपये म्हणजेच जवळपास दहा कोटी रुपये कमावता येतील.

आता हद्दच झाली! ATM मध्ये गेला आणि Hand Sanitizer वर मारला डल्ला; चोरीचा VIDEO VIRAL

ऑनलाइन लिलावात कसं सहभागी होता येईल :

या दुर्मीळ नाण्याच्या लिलावासाठी तुम्हाला ओएलएक्सवर(OLX)जावं लागेल. इंडिया मार्ट(indiamart.com)या वेबसाइटवरही त्याचा लिलाव करता येईल. यासाठी या वेबसाइटसवर जाऊन तुमची माहिती भरून तुमचं एक अकाउंट उघडा. त्यानंतर तुमच्याकडे असलेल्या या दुर्मीळ नाण्याचे वेगवेगळ्या कोनातून फोटो काढा आणि तुमच्या अकाउंटवर ते फोटो शेअर करा. या नाण्याची माहिती द्या आणि विक्रीसाठी(Online Sale)हे नाणं टाकत असल्याचं जाहीर करा. यापुढचं काम संबधित वेबसाइट करेल.

ओएलएक्स आणि अशा काही साईट्सवर दुर्मीळ वस्तूंच्या शोधातच असलेले चाहते,संग्राहक दुर्मीळ नाणी,वस्तू यांची वाटेल तेवढी किंमत देऊन खरेदी करतात. सध्या एक रुपयाच्या या विशिष्ट नाण्याला मागणी आहे. अर्थात अशा प्रत्येक नाण्याला हीच किंमत मिळेल असं नाही. हे त्या वेळच्या खरेदीदारावर अवलंबून असू शकतं.

तेव्हा तुमच्याजवळ अशी दुर्मीळ नाणी,नोटा,वस्तू असतील तर ऑनलाइन लिलावात त्याला नक्कीच लाखो,कोटी रुपये मिळू शकतात,हे लक्षात घ्या आणि जुन्या नाण्याचा संग्रह असेल तर त्यात तुम्हाला कोट्यधीश बनवणारं हे एक रुपयाचे मौल्यवान नाणे आहे का याचा शोध घ्या.

First published: April 30, 2021, 7:36 PM IST

ताज्या बातम्या