वॉशिंग्टन. 11 जानेवारी : अमेरिकेची फर्स्ट लेडी म्हणजेच राष्ट्रपति डोनाल्ड ट्रम्प यांची पत्नी मेलानिया ट्रम्प यांनी गेल्या आठवड्यात 6 जानेवारी रोजी यूएस कॅपिटलमध्ये हल्ल्यावरुन पहिल्यांदा आपलं मत व्यक्त केलं होतं. 6 जानेवारी रोजी यूएस कॅपिटल बिल्डिंगमध्ये अमेरिकेतील काँग्रेसची बैठक सुरू होती, तेव्हा ट्रम्प यांच्या हिंसक समर्थकांनी हल्लाबोल केला होता. या बैठकीत अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्रपती जो बायडन याच्या विजयाची औपचारिक पुष्टी होणार होती. ट्रम्प समर्थकांच्या हल्ल्यामुळे अमेरिकेतील काँग्रेसमधील खासदारांना लपावं लागलं होतं. या हल्ल्यात एक पोलीस अधिकाऱ्यासह 5 जणांचा मृत्यू झाला आहे.
मेलानियांचं वक्तव्य व्हाइट हाऊसच्या वेबसाइटवर पोस्ट करण्यात आलं आहे. या वक्तव्यात मेलानिया यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुनही ट्विट केलं आहे. मेलानिया या म्हणातात की, तुम्हा सर्वांप्रमाणे मीही जेव्हा गेलं वर्षे मागे वळून पाहते तेव्हा मला दिसतं की, अदृश्य शत्रू आणि कोविड-19 मुळे आपला सुंदर देश त्रस्त झाला आहे. सर्व नागरिकांनी आपल्या अनेक जवळच्या लोकांना गमावलं आहे. आणि आर्थिक अडचणी आणि एकटेपणाचा वाईट परिणाम पाहायला मिळत आहे. (Melania has spoken out against her husband Donald Trumps violent supporters)
हे ही वाचा-धक्कादायक! सॅनिटायजरमुळे 14 वर्षीय मुलाचा मृत्यू; प्रशासनाकडून सावधानतेचा इशारा
मेलानिया यांनी सांगितलं की, अमेरिकेच्या पहिल्या महिलेच्या रुपात मी अनुभव केला आहे की, आपल्या या महान देशात लोकांनी अडचणींचा सामना केला आहे आणि हे प्रेरणादायी आहे. मीदेखील अनेक प्रकारचा अनुभव घेतला आहे. नुकतीच झालेली घटना माझ्यासाठी खूप दु:खदायक आहे. यानंतर अफवा पसरवल्या जात आहेत, आणि काही लोकांनी माझ्याविरोधात खोटे आरोप लावले. यूएस कॅपिटलमध्ये जे झालं मी त्याचा निषेध करते. (Melania has spoken out against her husband Donald Trumps violent supporters) हिंसा कधीच स्वीकारली जाऊ शकत नाही. मी सर्व नागरिकांना विनंती करते की, हिंसा करू नका. वर्णभेद करू नका..आपल्यामध्ये फूट पडू देऊ नका. आपलं ध्येय एकत्रितपणे जाण्याचं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Donald Trump, President of america