इंदूर, 11 जानेवारी : सॅनिटाइजरमुळे आग लागल्याने राजनगर येथे राहणाऱ्या एका 14 वर्षीय मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या मुलाचं नाव विशेष संजय पांचल असं आहे. शुक्रवारी सायंकाळी तो मित्रांसोबत खेलत होता, तेव्हा त्याच्यासोबत हा अपघात झाला. यामध्ये सोमवारी या मुलाचा मृत्यू झाला आहे. (Sanitizer kills 14 year-old boy )
चंदननगर पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार विशेष एका दुकानाजवळ मित्रांसोबत खेळत होता. तेव्हा त्याला दुकानाच्या आत 5 लीटर सॅनिटायजरची कॅन दिसली. मित्रांच्या मदतीने त्याने एका ग्लास सॅनिटायजर ओतून ङेतलं आणि त्यात आगपेटीची काडी लावली आणि जाळायचा प्रयत्न केला. आग लागताच ग्लातून आगीची ज्वाळा बाहेर आली, घाबरुन मुलाने सॅनिटाजर फेकण्याचा प्रयत्न करीत असताना ते त्याच्या अंगावर पडले.
हे ही वाचा-पत्नीला चंद्र-तारे नकोत! पतीने नेमकं ओळखून केलं अनोखं काम, देशभरात होतंय कौतुक
इतकच नाही तर त्याच्या शरीरभर इन्फेक्शन पसरलं. दोन दिवस सुरू असलेल्या उपचारानंतर रविवारी अरबिंदो रुग्णालयात नेण्यात आले. मात्र मुलाची प्रकृती गंभीर झाली होती व त्यातच त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणात तपास केला आहे. पोस्टमार्टम केल्यानंतर मृतदेह त्याच्या कुटुंबीयांकडे सोपविण्यात आलं. फॉरेन्सिक विभागाने याचा तपास केला असून सॅनिटायजरचे सँपल घेतले आहेत. रिपोर्ट आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईव. (Sanitizer kills 14 year-old boy )टीआय योगेश तोमर यांनी सांगितलं की, सध्या मुलाच्या कुटुंबाला याचा मोठा धक्का बसला आहे. देशभरात कोरोनाच्या भीतीने सुरक्षा म्हणून मोठ्या प्रमाणात सॅनिटायजरचा वापर केला जात आहे. मात्र लहान मुलांकडे याबाबत अधिक लक्ष देण्याची गरज आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून अशा प्रकारच्या अनेक घटना समोर आल्याने प्रशासनाकडून सावधानतेचा इशारा देण्यात येत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona virus in india