लंडन 04 मे: चीन प्रमाणेच रशियातही कोरोना बाधितांच्या संख्येबद्दल फारशी माहितीच बाहेर येऊ दिली जात नसल्याची टीका होत आहे. रशियात कोरोना बाधितांच्या संख्येमुळे सगळी व्यवस्था कोलमडून पडली अशी माहिती बाहेर येत आहे. डॉक्टरांना PPE किट आणि मास्क मिळत नाहीत. जबरदस्तीने काम करून घेतलं जातं अशी टीका होत असतानाच काही धक्कादायक घटना उघडकीस आल्या आहेत. अपुऱ्या साधनांबद्दल टीका करणारे तीन डॉक्टर्स हॉस्पिटलच्या खिडकीतून खाली पडल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. त्यातल्या दोघांचा मृत्यू झाला तर तिसरा डॉक्टर मृत्यूशी झुंझ देत आहे. ‘ डेली मेल ’ने याबाबतचं वृत्त दिलं आहे. डॉ. अलेक्झांडर शुलेपाव हे कोव्हिड हॉस्पिटलमध्ये काम करत होते. नंतर त्यांनाही कोरोनाची लागण झाली. पॉझिटिव्ह निघाल्यानंतरही त्यांच्याकडून काम करवून घेतल्या जात होतं. यासगळ्याला कंटाळून त्यांनी एक व्हिडीओ तयार केला होता. त्यात सरकार आणि हॉस्पिटल प्रशासनाविरुद्ध टीका केली होती. अध्यक्ष ब्लादिमीर पुतिन यांच्याविरुद्ध बोलल्यामुळेच त्यांना गुप्तचरांनी खिडकीच्या खाली फेकून दिलं असावं असाही संशय व्यक्त केला जात आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर टाकला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी ते संशयास्पदरित्या हॉस्पिटलच्या खिडकितून खाली पडले. त्यांच्या डोक्याला जबर मार लागला असून ते आता हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देत आहेत. हे वाचा - चीननं असा पसरवला जगभरात कोरोना, अमेरिकेला मिळाला सर्वात मोठा पुरावा फक्त शुलेपावच नाही तर अशाच पद्धतीने टीका करणाऱ्या आणखी दोन डॉक्टरांचा हॉस्पिटलच्या खिडकितून पडून संशयास्पदरित्या मृत्यू झाला आहे. त्यांनीही सरकारच्या धोरणाविरुद्ध टीका केली होती. या तीनही डॉक्टरांची खाली पडण्याची पद्धत सारखीच असल्याने संशय व्यक्त केला जात आहे. केवळ सरकार विरुद्ध बोलल्यामुळेच या डॉक्टरांना खाली ढकलण्यात आलं असा आरोप होत आहे. हेही वाचा - …तर वर्षाअखेरीस मिळणार कोरोनाची लस, ट्रम्प यांचा सर्वात मोठा दावा 2 वर्षे तरी कोरोनाव्हायरसला रोखणं शक्य नाही, तज्ज्ञांचा दावा
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.