...तर वर्षाअखेरीस मिळणार कोरोनाची लस, ट्रम्प यांचा सर्वात मोठा दावा

...तर वर्षाअखेरीस मिळणार कोरोनाची लस, ट्रम्प यांचा सर्वात मोठा दावा

कोरोनावर अद्याप कोणत्याही देशाला लस शोधता आलेली नाही आहे, अशा परिस्थितीत कोरोना लसीबाबत ट्रम्प यांनी मोठा दावा केला आहे.

  • Share this:

वॉशिंग्टन, 04 एप्रिल : कोरोनामुळं अमेरिकेत हाहाकार माजला असताना गेल्या काही दिवसांपासून येथील मृत्यूदर कमी झाला आहे. अशा परिस्थितीत अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी असा दावा केला आहे की, कोरोनाव्हायरसची लस तयार करण्याचे काम जोरात सुरू असून, या वर्षाअखेरीस नक्कीच लस मिळेल. दरम्यान, अमेरिकेतील काही राज्यांमध्ये बाजार आणि दुकाने खुली करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र सामाजिक अंतर पाळणे बंधनकारक असणार आहे. ट्रम्प यांनी असा विश्वास व्यक्त केला आहे की, कोरोनाचा वाईट काळ टळून गेला आहे. अमेरिकेची अर्थव्यवस्था पुन्हा आपल्या पायावर उभी राहिल, अशी वेळ आता आली आहे.

दरम्यान, ज्या राज्यात डेमोक्रॅटचे पक्षाचे राज्यपाल आहेत त्या राज्यांमध्ये अजूनही लॉकडाऊन उघडण्यास परवानगी देण्यात आलेली नाही आहे. टेक्साससारख्या राज्यांना सिनेमा घरे, बार आणि रेस्टॉरंट उघडण्याची परवानगी दिली आहे. लॉकडाऊन उघडण्याची योजना अमेरिकेच्या जवळपास 35 राज्यांनी सुरू केली होती.

वाचा-सरकार देऊ शकत नाही, तर काँग्रेस मजुरांना रेल्वे तिकीटं काढून देणार -सोनिया गांधी

दुसरीकडे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी असा दावा केला आहे की आता अमेरिका लॉकडाऊन शिथील करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, या वर्षाच्या अखेरीस अमेरिकेत कोरोना विषाणूची लस तयार केली जाईल. डोनाल्ड ट्रम्प यांनी एका मुलाखती दरम्यान सांगितले की बरेच लोक अमेरिकेत या रोगाला घाबरत आहेत. काही लोकांना आजारपणाची भीती वाटते आणि काही लोकांना नोकरी गमावण्याची भीती आहे. अशा परिस्थितीत आपल्याला दोन्ही मुद्द्यांचा एकाच वेळी सामना करायचा आहे.

वाचा-लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात नागरिकांना दिलासा, आजपासून होणार असे बदल

एक लाखांपेक्षा कमी मृत्यू होतील

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी असा अंदाज व्यक्त केला आहे की, देशात कोव्हिड-19मुळे एक लाखाहूनही कमी मृत्यू होतील. व्हाइट हाऊस येथील कोरोना व्हायरस टास्क फोर्स समन्वयक डॉ. डेबोरा बर्क यांनी 29 मार्च रोजी कोरोनाव्हायरसमुळे 1 ते 2 लाख नागरिकांचा कोरोनामुळं मृत्यू होईल, असे सांगितले होते.त्याच वेळी ते म्हणाले की, कोरोनाबाबत सुरुवातील असे असे म्हटले जात होते की, लोकांनी कठोर पाऊले उचलली नाहीत किंवा वारंवार हात धुणे आणि लॉकडाउनचे पालन केले नाही तर 15 ते 22 लाख लोकांचा मृत्यू होऊ शकतो. मात्र त्यानंतर यांनी अंदाज लावायला सुरुवात केली की देशात एक लाखांपेक्षा कमी मृत्यू होतील.

वाचा-VIDEO:आम्हाला तुमचा अभिमान आहे!'कोरोना योद्धा' डॉक्टरचं घरी असं झालं स्वागत

First published: May 4, 2020, 9:40 AM IST

ताज्या बातम्या