वॉशिंग्टन, 4 फेब्रुवारी : अमेरिकेच्या (America News) न्यू मॅक्सिकोमध्ये चोरीचा एक अनोखा प्रकार समोर आला आहे. हत्यारांसह आलेल्या या चोराने (theft case) घरात मालक नसल्याचं पाहून घरात घुसला. चोराने घरात अंघोळ केली, झोपला, बियर प्यायला आणि जेवणही केलं. यानंतर त्याने घरमालकासाठी 200 डॉलर म्हणजे तब्बल 15 हजार रुपये ठेवले आणि निघून गेला. त्याचं झालं असं की, चोराकडून चुकून खिडकी तुटली गेली होती, त्याची भरपाई करण्यासाठी त्याने हे पैसे ठेवले होते. अखेर हा अनोखा चोर समोर आला आहे. 34 वर्षीय चोराचं नाव तेराल क्रिस्टेशन आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना 30 जानेवारी रोजी घडली. घरमालक परतला तर त्यांना हा चोर दिसला. हा चोर खिडकी तोडून घरात घुसला होता. तेरालकडे एक एआर-15 रायफल होती. त्याने घरातून काहीच चोरी केलं नव्हतं. घरमालकाला पाहिल्यानंतर चोराने त्याची माफी मागितली. चोराने सांगितलं की, त्याला रात्री झोपण्यासाठी एक उबदार जागेची गरज होती. यासाठी तो घरात घुसला. चोराने घरमालकाला खिडकीचं नुकसान केल्याबद्दल 200 डॉलर दिले. या घराचे मालक सांता फे न्यू मॅक्सिकन यांनी दिलेल्या माहितीनुसार, खिडकीचं नुकसान साधारण 200 डॉलर इतकं होतं. यानंतर चोर आपली रायफल आणि बॅगेसह निघून गेला. घर सोडण्यापूर्वी चोराने आपल्या कुटुंबाबद्दलही घर मालकाला सांगितलं होतं. त्याने सांगितलं की, टेक्सासमध्ये त्याच्या कुटुंबाची हत्या करण्यात आली होती. हे ही वाचा- रात्री EX-Boyfriend ला गेली भेटायला पार्कमध्ये, सकाळी आढळला अर्धनग्न मृतदेह चोराने सांगितलं की, या परिसराच्या बाहेरच त्याची कार बिघडली होती. यानंतर दुसऱ्या दिवशी पोलिसांना जबरदस्तीने कारची चोरी झाल्याचं वृत्त मिळालं. चोराचा चेहरादेखील घरात चोरी करणाऱ्याशी मिळता-जुळता होता. मिळालेल्या माहितीनुसार चोर एका महिलेला घेऊन रेस्टॉरंटला गेला आणि महिलेला कारमधून उतरण्यास सांगितलं. मात्र जेव्हा महिलेने आपला बचाव करण्यासाठी हार्न वाजवण्यास सुरुवात केली, तर तो तेथून पळून गेला. यानंतर पोलिसांना तो याच भागातील रस्त्यावर फिरताना दिसला. शेवटी चोरानेही आपला गुन्हा कबुल केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.