मुंबई, 7 फेब्रुवारी : प्रत्येक धर्मात अंत्यसंस्काराच्या (funeral) पद्धती वेगवेगळ्या असतात. हिंदू (Hindu) धर्मात पार्थिवाला अग्नी दिला जातो, तर काही ठिकाणी दफन करण्याचीही पद्धत आहे. मुस्लिम (Muslim) आणि ख्रिश्चन (Cristian) धर्मात मृतदेह दफन करण्याची पद्धत आहे. ज्याप्रमाणे वेगवेगळ्या धर्मात अंत्यसंस्काराच्या पद्धती वेगळ्या आहेत, त्याचप्रमाणे अनेक देशांमध्ये अंत्यसंस्काराच्या विविध पद्धती आढळतात. त्यापैकी काही ठिकाणी अत्यंत क्रूर पद्धतीने अंत्यसंस्कार केले जातात. काही ठिकाणच्या पद्धती फारच विचित्र आहेत. अशाच काही देशांमधल्या अंत्यसंस्काराच्या पद्धती जाणून घेऊ या. रडण्यास मनाई एखाद्या जवळच्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर रडणं (crying) ही फार सामान्य बाब आहे. परंतु इंडोनेशियामध्ये अशा वेळी रडण्यास मनाई आहे. इंडोनेशियात बालीमध्ये मृतांना जिवंत व्यक्तींप्रमाणे मानलं जातं. ती व्यक्ती झोपलेली (sleeping) असल्याचं समजलं जातं आणि त्यामुळेच मृत्यूनंतर तिथे रडत नाहीत. आत्मा शरीरात परत येतो, असा समज मृत व्यक्तीच्या आत्म्याला पूर्ण इच्छाशक्तीने बोलावल्यास तो त्याच्या शरीरात पुन्हा प्रवेश करू शकतो असं व्हिएतनाममध्ये मानलं जातं. यासाठी व्यक्तीच्या मृत्यूनंतर, त्याचा मोठा मुलगा किंवा मुलगी मृतदेहाचे कपडे काढून हवेत उडवतात आणि मृत व्यक्तीला बोलावतात. असं केल्याने त्याचा आत्मा शरीरात परत येतो, असा समज आहे. Hijab Controversy | हिजाब आणि बुरख्याशिवाय मुस्लिम महिला आणखी काय घालू शकतात? मृतदेहाचे छोटे-छोटे तुकडे तिबेटमधल्या बौद्ध समुदायामध्ये, एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या मृतदेहाचे लहान तुकडे (piecesof dead body) करून गिधाडांना खाऊ घालतात. याला स्काय बरिअल (sky burial) म्हणतात. याचा अर्थ आकाशात अंतिम संस्कार करणं असा होतो. असं केल्याने गिधाडासोबतच त्या व्यक्तीचा आत्माही उडून स्वर्गात पोहोचतो असं मानलं जातं. मृत शरीर गिधाडांना खायला देण्याची परंपरा पारशी समाजातही आहे. या समाजातल्या व्यक्तीचा मृतदेह टॉवर ऑफ सायलेन्समध्ये खूप उंचावर ठेवतात. हे मृतदेह नंतर गिधाडे खातात. मुंबईतही असा टॉवर ऑफ सायलेन्स (tower of silence) आहे. घरीच मृतदेह करतात दफन दक्षिण मेक्सिकोत मायन येथे मृतदेह घरीच पुरले जातात. त्यामुळे मृत्यूनंतरही ती व्यक्ती नातेवाईक (relatives) आणि प्रियजनांसोबत त्यांच्या घरातच राहते. असं म्हणतात, की असं करण्यामागे गरिबी (poverty) हेदेखील एक कारण आहे. याठिकाणी राहणाऱ्या नागरिकांजवळ बाहेर जाऊन मृतांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी पुरेसे पैसे (money) नसतात. त्यामुळे ते नातेवाईकांना घरीच दफन करतात. उंच खडकांवर लटकवतात मृतदेह चीन आणि फिलिपिन्समध्ये मृतदेह उंच खडकावर लटकवले जातात. यामागे असा समज आहे, की मृतदेह उंचावर लटकवल्यास त्यांचा आत्मा थेट स्वर्गात जातो. त्यामुळे तिथे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा मृतदेह शवपेटीमध्ये ठेवून उंच खडकांवर लटकवला जातो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.