जिनिव्हा 22 ऑगस्ट: जगभर सध्या एकच प्रश्न विचारला जातोय. तो प्रश्न आहे कोरोनावर लस केव्हा मिळणार? यावर जगभर संशोधन सुरु असून काही महिन्यांमध्ये ही लस तयार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ही लस तयार झाली तर ती जगभर पोहोचवायची कशी ही सर्वात मोठी समस्या सध्या जगासमोर आहे. यावर जागतिक आरोग्य संघटनेने WHO एक मेगा प्लान तयार केला आहे. तो सर्व देशांना दिला जाणार आहे. याची अंमलबजावणी सक्तीची नसली तरी तो मार्गदर्शक तत्व म्हणून उपयोगी होणार आहे. कोरोनावर लस आली आणि ती फक्त प्रगत देशांमधल्याच लोकांना मिळाली तर ते जगावरचं आणखी एक मोठं संकट असेल असं WHO म्हटलं आहे. कोरोनावर लस आली तर ती सर्वात आधी जगात सर्वाधिक गरज असलेल्या भागात पोहचावी, त्यानंतर त्या नुसार त्याचा क्रम असावा, गरीब देशांनाही ती योग्य वेळेत मिळावी असं WHOने म्हटलं आहे. त्याचबरोबर ती लस ज्या देशांना मिळेल त्यांनीही ती देण्याचा प्राधान्यक्रम आखावा असंही WHOने म्हटलं आहे. वयोवृद्ध नागरीक, शुगर, ब्लड प्रेशर असे आजार असलेले नागरीक यांना ती आधी दिली पाहिजे असंही जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे. लस तयार झाल्यावर त्याचं अतिशय मोठ्या प्रमाणात उत्पादन करणं आणि ती लस जगातल्या काना कोपऱ्यात पोहोचवणं हे मोठं आव्हान असून पुण्यातली सीरम ही औषध निर्माता कंपनी यात मोठी भूमिका बजावणार आहे. कोरोना लशीच्या संदर्भात रशियाने घेतला सर्वात मोठा निर्णय, जगाचं लागलं लक्ष! जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले की दोन वर्षांपेक्षा कमी कालावधीत कोरोना व्हायरस पृथ्वीपासून नष्ट होईल अशी आशा व्यक्त केली आहे. स्पॅनिश फ्लूपेक्षाही कोरोनाचा विषाणू नष्ट होण्यासाठी कमी वेळ लागेल अशी अशा जागतिक आरोग्य संघटनेनं व्यक्त केली आहे. कोरोनाच्या संसर्गाचा वेग दुप्पट झाला आहे त्यामुळे वेगानं पसरत आहे. एका दिवसात 83 कोटींच्या सॅनिटायझरचा वापर, 5 महिन्यातले आकडे वाचून बसेल धक्का 1918 साली जो फ्लू आला होत्या त्या महामारीमध्ये जगभरात मोठं नुकसान झालं होतं. त्यातुलनेत कोरोनाचा संसर्ग अगदी कमी कालावधीमध्ये पृथ्वीवरून जाऊ शकतो असा विश्वास जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी व्यक्त केला आहे. जगभरात 180 हून अधिक देशांत लाखोंच्या संख्येनं लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. रशियानं यावर पहिली लस काढली असली तरीही अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.