कोरोना लशीच्या संदर्भात रशियाने घेतला सर्वात मोठा निर्णय, जगाचं लागलं लक्ष!
रशियाच्या या चाचण्यांचे निष्कर्ष काय येतात याकडे सगळ्या जगाचं लक्ष असणार आहे.
|
1/ 7
जगभरातून शंका घेतल्यानंतर रशियाने आता कोरोना लशीसंदर्भात सर्वात मोठा निर्णय घेतला आहे. लशीवरचा विश्वास वाढावा यासाठी हा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे.
2/ 7
रशियाने या लशीची फेज-3ची ट्रायलच घेतली नाही असा आरोप झाला होता. त्यानंतर रशियाने हा निर्णय घेतला आहे.
3/ 7
रशियाने Sputnik V हे औषध शोधल्याचा दावा केला होता. मात्र त्यांच्या संशोधनाच्या पद्धतीवर जगभरातून टीका झाली होती.
4/ 7
रशियाने फक्त 38 लोकांवरच त्याचा प्रयोग केल्याचंही सांगितलं जात होतं.
5/ 7
जगभरातून शंका घेतल्या गेल्यानंतर आता 45 केंद्रांवर 40 हजार लोकांना ही लस देण्यात येणार असल्याचं रशियाने म्हटलं आहे.
6/ 7
कोरोनावरचं Sputnik V हे औषध सुरक्षित असल्याचा दावा रशिया कायम करत आला आहे.
7/ 7
त्यामुळे रशियाच्या या चाचण्यांचे निष्कर्ष काय येतात याकडे सगळ्या जगाचं लक्ष असणार आहे.