स्नेहा/नवी दिल्ली, 20 जुलै : दररोज कोरोनारुग्णांचे (COVID positive) नवनवे उच्चांकी आकडे समोर येत आहेत सोमवारी याचा कहर झाला. 40 हजार नवे रुग्ण 24 तासांत सापडले. आता खरोखरच देशात या साथीचा कहर झालाय का आणि आता तरी आलेख सर्वोच्च टोकावर (peak) आहे असं म्हणता येईल का? (Covid pandemic peak) याबद्दल विचारलं असता अखिल भारतीय वैद्यकीय विज्ञान संस्थेचे (AIIMS) संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी मुंबई, अहमदाबादमध्ये हे टोक येऊन गेलंय असं म्हणायला वाव असल्याचं सांगितलं. रणदीप गुलेरिया यांनी सोमवारी कोरोनाची साथ, प्रतिकारशक्ती, लस (COVID Vaccine) यासंदर्भात माहिती द्यायला माध्यमांशी संवाद साधला. त्या वेळी भारतात या साथीच्या उद्रेकानं टोक गाठलंय आणि आता साथ उतरणीला लागणार का असं विचारता ते म्हणाले, “काही भागांत Covid ने सर्वोच्च शिखर (Peak) गाठलंय असं म्हणता येईल. दिल्ली, मध्य मुंबई, अहमदाबाद या भागात साथीचा आलेख थोडा उतरणीला लागला आहे. देशात इतरत्रही साथीने सर्वोच्च टोक गाठून झालेलं असल्याची शक्यता आहे.” भारतीयांमध्ये व्हायरसविरोध प्रतिकारशक्ती? भारतीयांमध्ये कोरोना विषाणूशी लढायची प्रतिकारशक्ती आपोआप निर्माण झालेली असू शतते. कारण Coronavirus मुळे होणारे मृत्यू तुलनात्मक कमी झाले आहेत.
Certain areas have hit their peak. Delhi seems to have done so because the cases have declined significantly. Certain areas have yet to reach the peak. Cases are increasing in certain states. They will reach the peak a little later: AIIMS Director Randeep Guleria #COVID19 https://t.co/VTwU3jIO9j
— ANI (@ANI) July 20, 2020
देशातल्या काही भागात संसर्ग पसरायचा वेगही कमी आहे. म्हणजेच तिथल्या लोकांमध्ये रोगप्रतिकारशक्ती निर्माण झालेली आहे, असं म्हणता येईल. लस कधी येणार, किती परिणाम राहणार? भारत कोविडवरची लस शोधत आहे, ही चांगली गोष्ट आहे. भारतासारखा देश लशीचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्यास सक्षम आहे. निर्माण होणारी लस किमान एक ते दोन वर्षं रोगापासून संरक्षण देईल. पण सुरुवातीला लस कुणाला द्यायची याचा प्राधान्यक्रम ठरवायला हवा. वृद्ध व्यक्ती आणि इतर गंभीर आजार असणाऱ्या (Comorbid) व्यक्तींना प्राधान्याने लशीचे डोस द्यायला हवेत, असं मत डॉ. गुलेरिया यांनी व्यक्त केलं.