व्हँकुव्हर, 5 एप्रिल : रशियानं 24 फेब्रुवारीला युक्रेनवर (Ukraine) केलेल्या हल्ल्यामुळे युरोपमध्ये दुसऱ्या महायुद्धानंतरचे सर्वात मोठं निर्वासितांचं संकट निर्माण झालं. हजारो लोकांनी आपली घरं सोडली आहेत. हे लोक अनेक दशकांपासूनच्या आपल्या कुटुंबातील मौल्यवान वस्तू आणि संपत्ती मागे सोडून अक्षरशः पळून गेले आहेत. फेब्रुवारीच्या उत्तरार्धात जेव्हा रशियन सैन्यानं (Russian Army) युक्रेनमध्ये घुसण्यास सुरुवात केली, तेव्हा ब्रायन आणि शेरॉन यांनी कॅनडातील त्यांचं निवासस्थान "युक्रेनियन सेफ हेवन" (Ukrainian Safe Haven) नावाच्या निर्वासित गृहात बदलण्यास सुरुवात केली. ब्रायन यांचे आजी-आजोबा अनेक वर्षांपूर्वी युक्रेनमधून कॅनडात गेले होते. युक्रेनियन निर्वासितांना मदत करण्याचा त्यांचा निर्णय "अत्यंत वैयक्तिक" असल्याचं या जोडप्यानं सांगितलं.
युक्रेनच्या शेजारील देशांतील आणि जगाच्या इतर भागांतील अनेक लोकांनी विस्थापित युक्रेनियन नागरिकांसाठी आपले दरवाजे उघडले आहेत. हे कॅनेडियन जोडपंही आणखी मोठ्या प्रमाणावर तेच करत आहे. ब्रायन आणि शेरॉन होलोवेचुक या व्हँकुव्हर बेटाच्या जोडप्याकडे शेकडो लोकांना आश्रय देण्यासाठी एक जुना रिसॉर्ट आहे. हे ईस्ट सूक बेटावर आहे. कॅनडामध्ये येणाऱ्या युक्रेनियन निर्वासितांचं स्वागत करण्यासाठी हे जोडपं आता आपल्या 15,000 चौरस फुटांच्या रिसॉर्टमध्ये आवश्यक बदल करत आहेत. ब्रायन आणि शेरॉन यांनी त्यांच्या निवासस्थानाचं नाव 'युक्रेनियन सेफ हेवन' ठेवले. आता त्यांनी फेसबुकवर याचे काही फोटो शेअर केले आहेत.
हे वाचा - रस्त्याच्या जितका वापर टोलही तितकाच! सरकार नवीन टोल प्रणाली आणण्याच्या तयारीत
किमान 100 निर्वासितांचे स्वागत करण्यासाठी ते रिसॉर्ट तयार करत असल्याचं ब्रायन यांनी माध्यमांना सांगितलं. या जोडप्याने आधीच 19 लोकांचं बुकिंग केलं आहे, जे दोन ते तीन आठवड्यांत तिथं पोहोचतील. रिसॉर्टमध्ये एक वेबसाइट (ukrainiansafehaven.org) देखील आहे जी बेट आणि रिसॉर्टबद्दल सर्व आवश्यक माहिती प्रदान करते. व्हँकुव्हर बेटावरील हे रिसॉर्ट अनेक कुटुंबांच्या गरजेनुसार बनवलं जात आहे, असं वेबसाइटवर म्हटलंय. निर्वासितांच्या कुटुंबांना त्यांच्या पायावर उभं राहण्यासाठी अन्न, शिक्षण, वाहतूक यासह मदत दिली जाईल, असं संकेतस्थळावर नमूद करण्यात आलं आहे.
Published by:Digital Desk
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.