Home /News /videsh /

2,30,000 वर्षांपूर्वीचं कळणार रहस्य! या देशात सापडलं सर्वात प्राचीन मानवी जीवाश्म

2,30,000 वर्षांपूर्वीचं कळणार रहस्य! या देशात सापडलं सर्वात प्राचीन मानवी जीवाश्म

हे जीवाश्म होमो सेपियन्स जीवाश्मांच्या (Shala volcano) सुरुवातीच्या उदाहरणांपैकी एक मानले जात आहे.

  अदीस अबाबा, 21 जानेवारी-  इथोपिया (Ethiopia) मध्ये उत्खननात सापडलेले मानवी जीवाश्म (Human Fossils) 2,30,000 वर्षे जुनी असू शकतात, असा दावा एका नव्या संशोधनात तज्ज्ञांनी केला आहे. या जीवाश्मांना 'ओमो आय' या नावानं ओळखलं जातं. जीवाश्मांचा शोध 1960 च्या दशकाच्या अखेर लावण्यात आला होता. हे जीवाश्म होमो सेपियन्स जीवाश्मांच्या (Shala volcano) सुरुवातीच्या उदाहरणांपैकी एक मानले जात आहे. आतापर्यंत झालेल्या संशोधनात हे जीवाश्म 2,00,000 वर्षांहून कमी वयाचं सांगण्यात आलं होतं. परंतु नुकत्याच करण्यात आलेल्या एका रिचर्समध्ये हे तथ्य मांडण्यात आलं आहे. हे जीवाश्म 2,30,000 वर्षांपूर्वी मोठ्या प्रमाणात झालेल्या ज्वालामुखी स्फोटांपूर्वीचे असल्याची शक्यता आहे. संशोधकांच्या टिमनं ज्वालामुखीच्या राखेच्या पापुद्र्यांवर रासायनिक बोटांच्या निशाणांच्या वयाचा शोध घेतला आहे. ते तळाच्या वर आणि खाली उपस्थित आहेत. तिथेच पहिल्यांदा जीवाश्मांचा शोध लावण्यात आला होता. हे संशोधन अद्याप संपलेलं नाही, असं केंब्रिज विद्यापीठाच्या एका नव्या संशोधनातून समजले आहे. 30,000 वर्षे आणखी मागं गेलं माणसाचं वय

       वाचा    सूर्याकडे पाहताच येते शिंक; Sun Sneezing मागे आहे शास्त्रीय कारण

  या नव्या रिसर्चमुळे पूर्व अफ्रिकेत झालेल्या संशोधनात होमो सेपियन्सचं वय किमान वयाच्या 30,000 वर्षे मागं ढकललं गेलं आहे. भविष्यात होणाऱ्या संशोधनात हे वय आणखी कमी होऊ शकतं. पुरातत्व विभागानं 2017 मध्ये जगातील सर्वात प्राचीन होमो सेपियन्स जीवाश्म शोधल्याची घोषणा केली होती. मोरक्कोच्या जेबेल इरहौदमधील ती 3,00,000 वर्षे जुनी कवटी होती. अनेक दशकांपासून वैज्ञानिक पूर्व अफ्रिकेत सर्वात जुनं जीवाश्म शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. उच्च ज्वालामुखीय स्थानावर सापडले जीवाश्म ओमो आयचे अवशेष नैऋत्य इथियोपियाच्या ओमो किबिश फॉर्मेशनमध्ये आढळले होते. हा उच्च ज्वालामुखीय हालचालींचा प्रदेश आहे. तो पू्र्वी मानव कलाकृतींचा एक समृद्ध स्त्रोतही होता. रिसर्च पेपरचे प्रमुख लेखक कँब्रिजचे भूगोल विभागाचे डॉ. सेलाइन विडाल सांगतात, ज्वालामुखीच्या राखेच्या एका जाड थराखाली जीवाश्म एका रांगेत सापडले होते. राखेत शोधकाम कठीण ज्वालामुखीची राख खूपच बारीक असल्यानं आजपर्यंत हे शोधकार्य होऊ शकलं नव्हतं. गेल्या वर्षी चीनमध्ये संशोधकांनी माणसाठी पूर्णपणे नवीन प्रजाती असलेली एक प्राचीन कवटी शोधून काढली होती. वास्तवात ही कवटी 1933 मध्ये हर्बिनमध्ये आढळली होती. आणि २०२१ मध्ये वैज्ञानिकांनी यावर लक्ष केंद्रित केलं होतं. त्याचं उपनाव ड्रॅगन मॅन ठेवण्यात आलं होतं.
  Published by:News18 Web Desk
  First published:

  Tags: Africa, Lifestyle

  पुढील बातम्या