Home /News /lifestyle /

सूर्याकडे पाहताच येते शिंक; Sun Sneezing मागे आहे शास्त्रीय कारण

सूर्याकडे पाहताच येते शिंक; Sun Sneezing मागे आहे शास्त्रीय कारण

कडक उन्हात आल्यानंतर आणि सूर्याकडे पाहिल्यावर शिंक येण्याच्या क्रियेला वैज्ञानिक भाषेत सन स्नीझिंग (Sun Sneezing) असं म्हणतात.

मुंबई, 20 जानेवारी : सर्दी झाली की शिंका येतात (Sneezing), हे सर्वांनाच माहिती आहे. नाकात किंवा श्वसनमार्गात काही अडथळा असेल (Sneezing cause), तर तो बाहेर फेकण्यासाठी शिंक येण्याची क्रिया शरीराकडून घडते, ही मूलभूत बाबही आपल्याला माहिती असते; मात्र काही जणांना सूर्याच्या दिशेने पाहिल्यावरही शिंका येतात (Sun Sneezing). त्याचं आश्चर्यही वाटतं; पण त्यामागेही एक शास्त्रीय कारण आहे. कडक उन्हात आल्यानंतर आणि सूर्याकडे पाहिल्यावर शिंक येण्याच्या क्रियेला वैज्ञानिक भाषेत सन स्नीझिंग असं म्हणतात. सन स्नीझिंग नेमकं का घडतं, ही कुतुहलाची गोष्ट आहे. याबाबत हार्वर्ड मेडिकल स्कूलचे (Harvard Medical School) हेड अँड नेक सर्जन बेंजामिन ब्‍लेअर म्हणतात, एखादी व्यक्ती अतितीव्र प्रकाशाच्या संपर्कात येते, तेव्हा सन स्नीझिंग होतं. 18 ते 35 वर्षं वयोगटातल्या व्यक्तींमध्ये असं अनेकदा होतं. पुरुषांच्या तुलनेत महिलांच्या बाबतीत हा प्रकार अधिक प्रमाणात घडतो सन स्नीझिंग आनुवंशिक आहे. म्हणजेच ते एका पिढीतून दुसऱ्या पिढीपर्यंत पोहोचते. आणखी सोप्या भाषेत समजून घ्यायचं, तर आई वडिलांपासून मिळणाऱ्या कोणत्याही एका जीनमध्ये याचं म्युटेशन असतं आणि त्याचा संबंध सन स्‍नीझिंगशी असतो. (Sun Sneezing) असंच का होतं याचं नेमकं कारण अजूनही स्पष्ट झालेलं नाही. हे वाचा - थंडीत Heart Attack चा धोका वाढतोय; या चुकीच्या सवयी ताबडतोब बंद करा या प्रकारची शिंक येणं हे अजिबात धोकादायक नाही. यामुळे आरोग्यावर कोणताही विपरीत परिणाम होत नाही. मात्र ही शिंक कोणत्या परिस्थितीमध्ये येते, हे महत्त्वाचं आहं. वाहनचालक किंवा पायलटला अशा प्रकारे शिंक आली, तर ते धोकादायक ठरू शकतं, असं बेंजामिन म्हणाले. सन स्नीझिंगबाबत सिद्धांत सर्वात आधी ख्रिस्तपूर्व 350 व्या वर्षी ग्रीक तत्त्वज्ञ अरस्तूने याने मांडला होता. जेव्हा सूर्याची उष्णता नाकपुड्यांद्वारे नाकाच्या आतल्या भागात पोहोचते तेव्हा माणसाला शिंक येते, असा विचार त्याने मांडला होता. 17 व्या शतकात इंग्लंडचा शास्त्रत्र फ्रान्सिस बेकॉनने अरस्‍तूचा सिद्धांत नाकारला आणि आपला सिद्धांत मांडला. अरस्तूचा सिद्धांत खरा असेल, तर डोळे बंद करून सूर्याच्या दिशेने तोंड केल्यावर शिंक का येत नाही, असं म्हणणं फ्रान्सिसने मांडलं. फ्रान्सिसचं म्हणणं होतं, की शिंक येण्यासाठी डोळ्यांची भूमिका फार महत्त्वाची असते. यानंतर अनेक जणांनी अभ्यास केला. त्यात म्हटलं गेलं, की प्रकाशाची तीव्रता बदलणं, हे शिंक येण्याचं कारण आहे. जेव्हा आपण विशेष तीव्रता असलेल्या उजेडाच्या ठिकाणी येतो तेव्हा असं होतं. अशा परिस्थितीत नाकात एक संवेदना जाणवते आणि शिंक येते. हे वाचा - शरीराची Immunity वाढवण्यासाठी औषधे नकोत, खा ही 7 फळं; आजार राहतील कोसो दूर इतक्या संशोधनानंतरही सन स्‍नीझिंगचं (Sun Sneezing) मुख्य कारण कळू शकलं नाही. मात्र शास्त्रज्ञ डॉ. हेन्री एवरेटच्या संकल्पनेची अनेक वैज्ञानिकांनी स्तुती केली आणि त्याला मान्यता दिली. डॉ. हेन्री यांनी 1964 मध्ये स्वत:चा सिद्धांत मांडला. डॉ. हेन्री यांनी आपल्या सिद्धांतामध्ये म्हटलं आहे, की जेव्हा व्यक्ती कडक उन्हात जाते आणि डोळ्यांवर तीव्र प्रकाश पडतो, तेव्हा बाहुली आकुंचन पावते आणि मेंदूचे संदेश वाहून नेणाऱ्या मज्जातंतूमध्ये संवेदना जाणवतात. त्यामुळे असं होतं.
First published:

Tags: Health, Lifestyle

पुढील बातम्या