मराठी बातम्या /बातम्या /विदेश /अंडरवेअरमध्ये पैसे लपवताना खासदार रंगेहाथ सापडले; सर्वसामान्यांच्या कोरोना फंडामध्ये घोटाळा

अंडरवेअरमध्ये पैसे लपवताना खासदार रंगेहाथ सापडले; सर्वसामान्यांच्या कोरोना फंडामध्ये घोटाळा

भ्रष्ट्राचारविरोधी घोषणा देणाऱ्या पक्षाच्या खासदारावर कोरोना फंडातील पैशांची अफरातफर केल्याचा आरोप आहे

भ्रष्ट्राचारविरोधी घोषणा देणाऱ्या पक्षाच्या खासदारावर कोरोना फंडातील पैशांची अफरातफर केल्याचा आरोप आहे

भ्रष्ट्राचारविरोधी घोषणा देणाऱ्या पक्षाच्या खासदारावर कोरोना फंडातील पैशांची अफरातफर केल्याचा आरोप आहे

रियो दि जानिरो, 16 ऑक्टोबर : जगातील अनेक भागात कोरोनामध्ये भ्रष्टाचाराच्या घटनाही समोर आल्या आहेत. अशातच ब्राझीलमधून अशाच स्वरुपाची बातमी समोर आली आहे. भ्रष्टाचारविरोधी पथकाने घातलेल्या एका छापेमारीत राष्ट्रपती जेअर बोलसनारो यांच्या पक्षाचे एक खासदार अंडरवेअरमध्ये पैसे लपवलेल्या अवस्थेत रंगेहाथ सापडले. त्यांची तपासणी केली असता चिको रॉड्रिग्ज यांच्या अंडरवेअरमधून 3 लाख 88 हजार ब्राझिलियन रियाल एवढी रक्कम जप्त करण्यात आली आहे.

सत्ताधारी पक्षातील एक खासदार भ्रष्ट्राचार करीत असल्याची माहिती भ्रष्टाचारविरोधी पथकाला मिळाली होती. त्यानंतर उत्तर ब्राझीलमधील रोरिमा राज्यातील चिको रॉड्रिग्सच्या घरावर बुधवारी छापेमारी करण्यात आली. रोरिमा राज्याला कोरोना संसर्गाशी सामना करण्यासाठी देण्यात आलेल्या फंडामध्ये हा गोंधळ घातल्याचा आरोप होता.

हे ही वाचा-Shocking VIDEO: भाजप आमदाराच्या निकटवर्तीय नेत्याकडून पोलिसांसमोरच गोळीबार

यानंतर मात्र चिको रॉड्रिग्स यांनी एक पत्र प्रसिद्ध केलं आहे. यामध्ये त्यांनी पोलिसांनी घरात धाड घातल्याची माहिती दिली आहे. मात्र पोलिसांनी मिळालेल्या रोखरकमेचा उल्लेख केलाला नाही, शिवाय रक्कम कुठे सापडली हेदेखील नमूद करण्यात आले नसल्याचे त्यांनी आपल्या प्रसिद्धी प्रत्रकात म्हटलं आहे. आपल्याला बदनाम करण्यासाठी हे कारस्थान रचल्याचं त्यांनी सांगितलं आहे. ब्राझीलचे राष्ट्रपती बोलसनारो यांना भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठविल्यामुळे सत्ता मिळाली होती. मात्र जेव्हापासून त्यांनी राष्ट्रपती पद स्वीकारलं आहे, तेव्हापासून त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले जात आहे.

एकीकडे जगभरात कोरोनाचा हाहाकार सुरू आहे. दररोज हजारो लोकांचा मृत्यू होत आहे. अशात लोकांसाठी जमा केलेल्या कोरोना फंडातील पैसांची अशा प्रकारे अफरातफर केल्यामुळे लोकांमध्ये मोठी चीड निर्माण झाली आहे.

First published:
top videos

    Tags: Corona, Coronavirus