बलिया/उत्तर प्रदेश, 16 ऑक्टोबर : भाजप नेत्यानं गुंडगिरी करत हातात बंदुक घेऊन अधिकाऱ्यांसमोरच तरुणाच्या डोक्यात गोळी घालून त्याची हत्या केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. भाजप नेत्यानं कायदा हातात घेऊन गुंडगिरी केल्याचा धक्कादायक प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला. भाजप नेत्याने एसडीएम आणि सीओसमोर एका युवकाला गोळ्या घालून त्याचा खून केला आणि आरोपी नेता तिथून फरार झाला आहे. ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील बलिया परिसरात घडली.
उत्तर प्रदेशात भाजपचं सरकार आहे. अशा परिस्थिती घडलेल्या या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर भाजप नेत्याला पकडल्याची माहिती मिळाली आहे. या व्हिडीओमध्ये भरदिवसा भाजप नेता अधिकाऱ्यांसमोर थेट एका तरुणाला गोळ्या घालत असल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर प्रशासन आणि कायदा सुव्यवस्थेवर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.
भाजप नेत्याची गुंडगिरी...पोलीस अधिकाऱ्यांसमोर गोळ्या घालून तरुणाची हत्या थरारक व्हिडीओ समोर pic.twitter.com/2p0UKQUlUr
बलिया से बड़बोले बीजेपी विधायक सुरेंद्र सिंह के करीबी नेता धीरेंद्र सिंह ने SDM और CO के सामने एक शख़्स की गोली मार कर हत्या कर दी है। ऐसे विधायक पर कारवाई नहीं हुई तो ये अपने साथ पार्टी को भी ले डूबेंगे। @myogiadityanath
मिळालेल्या माहितीनुसार ही घटना रेवती पोलीस ठाणा क्षेत्रातील दुर्जनपूर गावात घडली. भाजप नेते धीरेंद्र सिंह सिंह यांनी जयप्रकाश पाल नावाच्या तरुणाची गोळी घालून हत्या केल्याचा आरोप आहे. दुकानावरून होत असलेला वाद शिगेला पोहोचला आणि त्यातून हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दुकानाच्या हिस्स्यासंदर्भात पंचायत भवनमध्ये बैठक सुरू होती. त्याचवेळी भाजप नेत्यानं उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांसमोरच बंदूक काढून जयप्रकाश पाल तरुणावर गोळी झाडली.