न्यूझीलँड, 28 नोव्हेंबर : ती स्त्री आहे, काहीही करू शकते...बॉलिवूड चित्रपटांमध्ये स्त्रीचं कृतृत्व सांगणारा हा डायलॉग बऱ्याच गोष्टी सांगून जातो. तसं पाहता महिलांना अनेकदा प्रतिकूल परिस्थितीतही काम करावं लागतं. ज्याबद्दल पुरुष विचारही करू शकणार नाही. अशीच एक घटना न्यूझीलँडमध्ये (New Zealand News) घडली आहे.
येथे कोणी दुसरं नाही तर एक महिला खासदाराने ज्या परिस्थितीत आपल्या मुलाला जन्म दिला ते पाहून तुम्हालाही धक्का बसेल. या गर्भवती खासदार जुली एन जेंटरने रात्री 2 वाजता लेबर पेन सुरू झाल्यानंतर सायकलवरुन रुग्णालयाच्या दिशेने धाव घेतली. आणि विशेष म्हणजे रुग्णालयात पोहोचल्याच्या एका तासात तिची साधारण 3.04 वाजता डिलिव्हरी झाली. (The MP reached the hospital on a bicycle after the labor pains started)
जुलीने सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना याबाबत माहिती दिली. त्यांनी फेसबुकवर सायकल राइड ते बाळाच्या जन्मापर्यंतचे अनेक फोटो शेअर केले आहे. त्यात त्यांनी लिहिलय..बिग न्यूज...आज सकाळी 3.04 वाजता आमच्या कुटुंबात आणखी एका सदस्याचं आगमन झालं. मी माझं लेबर पेन सायकलवर सुरू होईल, असा विचारही केला नव्हता. जेव्हा आम्ही रुग्णालयात जाण्यासाठी निघालो तेव्हा फार त्रास होत नव्हता. मात्र रुग्णालयापर्यंतचे 2 ते 3 मिनिटाचं अंतर पार करण्यासाठी आम्हाला 10 मिनिटं लागली. आता आमच्या कुटुंबात एक बाळ आलं आहे.
हे ही वाचा-स्टार लोकांना लुबाडणारी शिल्पा, तब्बल 100 कोटींपेक्षाही मोठी फसवणूक
लोकांनी केलं आईचं कौतुक
जूलीच्या या पोस्टवर लोक प्रतिक्रिया देत आहेत. एका महिलेने लिहिलं आहे की, मी तर प्रेग्नेन्सीदरम्यान कारचं सीट बेल्टदेखील लावू शकत नव्हते.
काही दिवसांपूर्वी न्यूझीलँडच्या पंतप्रधान जेसिंडा अर्डर्नदेखील आपल्या मुलीमुळे चर्चेत होत्या. त्याचं झालं असं की, जेसिंडा या घरून फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधत होती. अचानक त्यांच्या खोलीत त्यांची मुलगी शिरली. तीन वर्षांच्या मुलीला मागे पाहून तिने तिला बेडवर जाण्यास सांगितलं. या व्हिडीओतून जेसिंडा या घर, मुलांसह देशही किती व्यवस्थितपणे सांभाळत असल्याने कौतुक केलं जात होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Pregnancy