मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

भयावह! आईने मुलीच्या Love Storyचा असा केला End; 25 वर्षांपर्यंत सुरू होता जीवघेणा खेळ

भयावह! आईने मुलीच्या Love Storyचा असा केला End; 25 वर्षांपर्यंत सुरू होता जीवघेणा खेळ

एखादी आई आपल्या मुलीला अशी शिक्षा देऊ शकते, याचा कधीच कोणी विचारही करू शकत नाही.

एखादी आई आपल्या मुलीला अशी शिक्षा देऊ शकते, याचा कधीच कोणी विचारही करू शकत नाही.

एखादी आई आपल्या मुलीला अशी शिक्षा देऊ शकते, याचा कधीच कोणी विचारही करू शकत नाही.

  • Published by:  Meenal Gangurde
पॅरिस, 6 सप्टेंबर : अनेकदा मुलांच्या आवडी-निवडी पालकांच्या पसंतीस पडत नाही. त्यातही जेव्हा पार्टनर शोधण्याची वेळ येते, (Life Partner) तेव्हा मुलांच्या निर्णयामुळे पालक नाराज होतात. कधी कधी तर हा राग इतका वाढतो की, वर्षानुवर्षांसाठी त्यांच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण होता. मात्र फ्रान्समध्ये (France) राहणाऱ्या या महिलेने क्रूरतेच्या सर्व सीमा पार केल्या आणि आपल्या मुलीला स्वत:चा पती निवडण्याची मोठी शिक्षा सुनावली. (The mother's refusal to the partner chosen by the girl given the most brutal punishment event in history) आईला हवा होता श्रीमंत जावई मिररमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, फान्समधील (France) विएनमध्ये राहणारी ब्लँच मोनियर (Blanche Monnier) हिला एका व्यक्तीसोबत प्रेम झालं होतं. जेव्हा तिची आई मॅडम मोनियर (Madame Monnier) यांना याबाबत कळाल तर त्या संतापल्या. एखाद्या श्रीमंत घरात मुलीचं लग्न व्हावं अशी मोनियर यांची इच्छा होती. मात्र ब्लँचला एका सर्वसाधारण घरातील मुलाच्या प्रेमात पडली होती. आईने मुलीला अनेकदा समजावलं. मात्र मुलगी आईचा एकही शब्द ऐकत नव्हती. यानंतर तरुणीच्या आईने मुलीला अशी शिक्षा दिली की, कोणी याचा विचारही करू शकणार नाही. मुलीच्या पसंतीच्या मुलाला दिला नकार ही घटना खूप जुनी आहे. मात्र तरीही हे वृत्त वाचताना अनेकांच्या अंगावर काटा उभा राहतो. ही घटना 1876 सालातील आहे. जेव्हा ब्लँच मोनियर 25 वर्षांची होती. त्यावेळी ती एका मुलाला भेटली व त्याच्या प्रेमात पडली. मात्र जेव्हा आईला याबद्दल कळात तर तिने या प्रेमाला नकार दिला. ब्लँचच्या वडिलांचं निधन झालं होतं, त्यामुळे मुलगी श्रीमंत घरात जावी, अशी तिची इच्छा होती. हे ही वाचा-जमिनीच्या तुकड्यासाठी जन्मदात्या आईचा भयावह अंत; अंगावर काटा उभा राहील मात्र यावर मुलीनेही संताप व्यक्त केला. दोघींमध्ये वाद होऊ लागला. ऐकी दिवशी तरुणीच्या आईने तिला एका कोठडीत बंद केलं. आईचा राग शांत झाल्यावर ती बाहेर काढेल, अशी मुलीला आशा होती. मात्र असं झालं नाही. अनेक वर्षे लोटले तरीही आईने तिला बाहेर काढलं नाही. ब्लँचला अंधाऱ्या खोलीत एका साखळीने बांधून ठेवलं होतं. आईने शेजारच्यांना सांगितलं होतं की, त्यांची मुलगी वेडी झाली आहे, त्यामुळे तिच्या ओरडण्याकडे लक्ष देऊ नका. काही वर्षांनंतर मुलीचा आरडाओरडाही बंद झाला. शेजारच्यांना वाटलं की, मुलीचं निधन झालं असावं. ब्लँच तब्बल वयाच्या 50 पर्यंत कोठडीत साखरीने बांधलेल्या अवस्थेत आपल्या मृत्यूच्या प्रतीक्षेत होती. तिला जेमतेम जेवण दिलं जात होतं. शेवटी 25 वर्षांनंतर ब्लँच मोनियरची सुटका झाली. मिळालेल्या माहितीनुसार, पॅरिसचे अटर्नी जनरल यांना एका अज्ञान व्यक्तीने पत्र लिहिलं होतं. 23 मे 1901 रोजी मिळालेल्या या पत्रात लिहिलं होतं की, मॅडम मोनियरने आपल्या मुलीला 25 वर्षे एका कोठडीत बंद करून ठेवलं होतं. यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. जेव्हा सत्य उघड झालं तेव्हा सर्वांनाच धक्का बसला. 12 वर्षांनंतर झाला मृत्यू पोलिस कर्मचारी जेव्हा घरात घुसले तेव्हा त्यांना काहीच दिसत नव्हतं. सर्वत्र अंधार होता. यानंतर कशीबशी खिडकी उघडली. तेव्हा पलंगाच्या मागे साखळीने बांधलेल्या अवस्थेत एक महिला दिसली. ती ब्लँच होती. तिला पाहून वाटतं होतं की एखादा मानवी सांगाडा बसला आहे. ब्लँचला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि तिच्या आईला अटक करण्यात आलं. आईच्या क्रुरतेचा परिणाम मुलीच्या आयुष्यावर झाला होता. त्यानंतर पुढील 12 वर्षांनंतर ब्लँचचं निधन झालं. तर तिच्या आईचा अटक केल्याच्या 15 दिवसात मृत्यू झाला. फ्रान्सच्या इतिहासात ही अत्यंत क्रूर घटना म्हणून गणली जाते.

First published:

Tags: Crime news, France, Love story, Mother

पुढील बातम्या