• Home
 • »
 • News
 • »
 • crime
 • »
 • जमिनीच्या तुकड्यासाठी जन्मदात्या आईचा भयावह अंत; अंगावर काटा उभा राहील

जमिनीच्या तुकड्यासाठी जन्मदात्या आईचा भयावह अंत; अंगावर काटा उभा राहील

आईच्या जीवापेक्षाही जमिनीचा तुकडा इतका मौलवान ठरला? पैसा नात्यांपेक्षा इतका मोठा झाला का?

 • Share this:
  पानीपत, 6 सप्टेंबर : जगात अनेक नाती पुन्हा तयार केले जाऊ शकतात, मात्र आई-वडिलांचं नातं कधीच दुसऱ्यांचा तयार होऊ शकत नाही, असं म्हणतात. मात्र या जन्मदात्या आईच्या सुखासाठी आपण किती प्रयत्न करतो, हा पुन्हा एकदा चर्चाचा विषय आहे. मात्र अनेक ठिकाणी तर तर संपत्तीच्या मोहापायी स्वत:च्या आईचीच हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Murder of a mother for a piece of land) ही घटना हरियाणातील पानीपत जिल्ह्यातील (Panipat district of Haryana) आहे. हे वृत्त वाचून कोणाच्याही पायाखालची जमीन सरकेल. येथे एका मुलाने जमिनीच्या विवादातून आपल्या स्वत:च्या आईची हत्या केली. ही घटना पानीपत जिल्ह्यातील बबेल या गावातील आहे. येथे एका मुलाने आईची गळा दाबून हत्या (Murder) केली. आईची हत्या केल्यानंतर आरोपी मुलगा फरार झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस (Police) घटनास्थळी दाखल झाले. हे ही वाचा-मोबाइलमध्ये लेकीचा बलात्काराचा VIDEO पाहून बापाने उचललं धक्कादायक पाऊल पोलिसांनी महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला असून पोस्टमार्टमसाठी पानीपत जिल्ह्यातील रुग्णालयात पाठविण्यात आलं आहे. सध्या पोलिसांनी आरोपी मुलाविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा तपास सुरू आहे. हे वृत्त समोर आल्यानंतर गावात खळबळ उडाली आहे. जन्मदात्या आईची हत्या करणाऱ्या मुलांविरोधात गावभरात मोठी चर्चा सुरू आहे. आईच्या जीवापेक्षाही जमिनीचा तुकडा इतका मौलवान ठरला? पैसा नात्यांपेक्षा इतका मोठा झाला का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
  Published by:Meenal Gangurde
  First published: