मराठी बातम्या /बातम्या /विदेश /आईने 6 व्या महिन्यात दिला पेन इतक्या आकाराच्या बाळाला जन्म; 1 किलोपेक्षाही कमी वजन, डॉक्टरही हैराण

आईने 6 व्या महिन्यात दिला पेन इतक्या आकाराच्या बाळाला जन्म; 1 किलोपेक्षाही कमी वजन, डॉक्टरही हैराण

विज्ञानाचा असाच एक चमत्कार (England) घडला आहे.

विज्ञानाचा असाच एक चमत्कार (England) घडला आहे.

विज्ञानाचा असाच एक चमत्कार (England) घडला आहे.

    इंग्लंड, 18 ऑक्टोबर : वैद्यकीय शास्त्रातल्या प्रगतीमुळे आता अनेक अशक्य त्या गोष्टी शक्य झाल्या आहेत. कोणत्याही परिस्थितीत आई आणि बाळाचा जीव वाचवणंही शक्य झालं आहे. अगदी अपुऱ्या दिवसांच्या (Premature Baby), कमी वजनाच्या बाळांना वाचवणंही शक्य झालं आहे. विज्ञानाचा असाच एक चमत्कार इंग्लंडमध्ये (England) घडला आहे. 2017 मध्ये सहाव्या महिन्यातच जन्माला आलेल्या अवघ्या पेनाएवढ्या (Pen) आकाराच्या बाळाला जीवदान मिळालं असून, आता ते बाळ चार वर्षांचं झालं आहे. सोशल मीडियावर या बाळाची आणि त्याच्या आईची कहाणी व्हायरल झाली आहे.

    कोणत्याही स्त्रीसाठी आई होण्याचा आनंद सर्वांत मोठा असतो. जेव्हा एखादी स्त्री आपल्या मुलाला जन्म देते आणि पहिल्यांदा त्याला दूध पाजण्यासाठी जवळ घेते तेव्हा तो क्षण तिच्या आयुष्यातला सर्वांत खास असतो; पण इंग्लंडमधल्या लिव्हरपूल इथं राहणाऱ्या कॅरनला मात्र आपल्या मुलीला जन्म देताच हे सुख अनुभवता आलं नाही. आपल्या बाळाला तिला जवळदेखील घेता आलं नाही. कारण तिचं बाळ सहा महिन्यांनंतर म्हणजेच तीन महिने आधीच जन्माला आलं होतं आणि त्याचं वजन फक्त 650 ग्रॅम होतं. हे बाळ जेमतेम एका पेनाएवढ्या आकाराचं होतं. 23 आठवड्यांनी जन्माला आलेल्या या बाळाला तत्काळ इन्क्युबेटरमध्ये ठेवावं लागलं. हे इवलंसं बाळ जगेल का याची शाश्वती डॉक्टरांनाही नव्हती. या बाळाची आणि त्याच्या आईची इच्छाशक्ती जबर असावी. त्यामुळे आयसीयूमध्ये (ICU) 13 महिने चिवट झुंज देऊन या बाळानं मृत्यूवर मात केली आणि तब्बल 13 महिन्यांनी ते आपल्या आईच्या कुशीत विसावलं.

    या बाळाचं नाव बेट्टी बॅट (Betty Batt) असं असून, ती जन्मतः एका पेनाच्या आकाराएवढी होती. 13 महिने आयसीयूमध्ये काढल्यानंतर ती जुलै 2018 मध्ये घरी आली. आता ती चार वर्षांची असून अगदी निरोगी आहे. अत्यंत कठीण परिस्थितीवर मात करूनही ती जिवंत राहिली याचं डॉक्टरांनाही आश्चर्य वाटतं. ती जगली हा एक चमत्कार असल्याचं कॅरन म्हणते. या मुलीच्या जन्माच्या एक वर्ष आधी कॅरनने जॉर्ज नावाच्या मुलाला जन्म दिला होता. त्याचाही जन्म 22 आठवड्यांनी झाला होता; पण तो फक्त 2 तास जगू शकला. कॅरन आणि तिच्या पतीला जॉर्जच्या मृत्यूचं खूप दुःख झालं होतं. त्यानंतर बेट्टीचा जन्मही अपुऱ्या दिवसांनी झाल्यानं त्यांना तीही जगते की नाही याची भीती वाटत होती; पण बेट्टीनं सगळ्या आव्हानांवर मात केली.

    हे ही वाचा-पेट्रोल पंपावरील टॉयलेटमध्ये गेलेल्या महिलेसोबत घडलं अनपेक्षित; पाहताच पती अवाक

    कॅरनला आणखी एक मोठी मुलगी आणि मुलगा असून, आपल्याला आणखी एक छोटी बहीण मिळाल्याने ती दोघंही खूप आनंदी आहेत. बेट्टीच्या जन्मापासून घरात खूप आनंदाचं वातावरण असल्याचं कॅरननं म्हटलं आहे.

    First published:
    top videos

      Tags: England, Mother, One child