नवी दिल्ली, 14 जून : वडापाव, पाणीपुरी, चाट यांसारखं भारतीय स्ट्रीट फूड (Indian Street Food) आता सातासमुद्रापार पोहोचलं आहे. हे पदार्थ न आवडणारी व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. भारतात मोठ्या प्रमाणात स्ट्रीट फूडला पसंती दिली जाते; पण आता हे पदार्थ अमेरिकेसारख्या (America) मोठ्या देशांमध्ये सहज उपलब्ध होत आहेत. अमेरिकेतल्या काही रेस्टॉरंट्समध्ये भारतीय स्ट्रीट फूडची विक्री होते. सध्या अमेरिकेतलं एक रेस्टॉरंट भारतीय स्ट्रीट फूडमुळे विशेष चर्चेत आलं आहे. या रेस्टॉरंटला अमेरिकेतला प्रतिष्ठेचा बेस्ट रेस्टॉरंट पुरस्कार (Best Restaurant Award) मिळाला आहे. या पुरस्कारामुळे खऱ्या अर्थानं भारतीय स्ट्रीट फूडचा गौरव झाला आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. विशेष म्हणजे कोरोनाच्या दोन वर्षांनंतर यंदा प्रथमच या पुररस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. `एनडीटीव्ही इंडिया`ने याविषयीचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. अमेरिकेतल्या चाय-पानी नावाच्या रेस्टॉरंटला (Chai-Pani Restaurant) सर्वोत्कृष्ट रेस्टॉरंट या पुरस्कारानं गौरवण्यात आलं आहे. अमेरिकेतल्या उत्तर कॅरोलिनामध्ये (North Carolina) असलेलं हे रेस्टॉरंट रास्त दरांत भारतीय स्ट्रीट फूड उपलब्ध करून देतं. `ब्लूमबर्ग`च्या वृत्तानुसार, सोमवारी (13 जून 2022) शिकागो इथल्या जेम्स बियर्ड फाउंडेशन अॅवॉर्ड्समध्ये अॅशविलेमधल्या या रेस्टॉरंटला अमेरिकेतलं सर्वोत्कृष्ट रेस्टॉरंट म्हणून नॉमिनेट केलं गेलं. हे रेस्टॉरंट न्यू ऑरलियन्समधील ब्रेननसारख्या नामांकित नॉमिनीजमध्ये अव्वल ठरलं. चाय-पानी याचा अर्थ चहा आणि पाणी असा आहे. या रेस्टॉरंटमधल्या चाट या खाद्य विभागात मसालेदार, गोड आणि तिखट असे भारतीय स्नॅक्स समाविष्ट आहेत. या अॅवॉर्ड विनर्समध्ये मिनियापोलिसमधल्या ओवामानी या मूळ अमेरिकी रेस्टॉरंटचा समावेश आहे. या रेस्टॉरंटमध्ये 75 टक्के स्थानिक कर्मचारी काम करतात.
Mashama Bailey, 2022 #jbfa Outstanding Chef, is paving the way for the next generation of Black chefs.@AmericanAir pic.twitter.com/V9hAr1taGC
— James Beard Foundation (@beardfoundation) June 14, 2022
कोविड-19 विषाणूचा (Covid-19 Virus) संसर्ग रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनमध्ये अमेरिकेतली अनेक रेस्टॉरंट्स कायमस्वरूपी बंद झाली. हा पुरस्कार सोहळा 2020 आणि 2021 अशी सलग दोन वर्षं रद्द झाला होता. मोठ्या अर्थव्यवस्थेला धोका निर्माण करणाऱ्या वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर गेल्या चार दशकांमध्ये अमेरिकी नागरिक अन्नासाठी सर्वाधिक किंमत मोजत असतानाच्या वर्षात हे पुरस्कार पुन्हा दिले गेले आहेत. यंदाचे पुरस्कार आणि नॉमिनी स्लेट अमेरिकेचा चेहरामोहरा अधिक चांगल्या प्रकारे प्रतिबिंबित करणारे ठरले. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा भौगोलिक विविधतादेखील अधिक प्रमाणात पाहायला मिळाली. यातले बहुतांश पुरस्कारविजेते न्यूयॉर्क (New York) आणि शिकागोच्या (Chicago) बाहेरचे होते.