मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण अ‍ॅम्ब्युलन्सच्या खिडकीतूनच पडले बाहेर, महाराष्ट्रातील धक्कादायक प्रकार

कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण अ‍ॅम्ब्युलन्सच्या खिडकीतूनच पडले बाहेर, महाराष्ट्रातील धक्कादायक प्रकार

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर चक्क अ‍ॅम्ब्युलन्सच्या खिडकीतून बाहेर पडण्याची नामुष्की ओढावली आहे.

गुहागर, 26 मे : महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांबाबत आता काही अजब प्रकार समोर येऊ लागले आहेत. रुग्णवाहिका न मिळाल्याने रुग्णांना रस्त्यावर ताटकळत उभार राहिल्याचा प्रकार ताजा असतानाच आता कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर चक्क अ‍ॅम्ब्युलन्सच्या खिडकीतून बाहेर पडण्याची नामुष्की ओढावली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागरमध्ये हा प्रकार घडला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागरमध्ये काल दिवसभरात 4 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले. या पॉझिटिव्ह रुग्णांना एका रुग्णवाहिकेतून गुहागरमधील वेळणेश्वर येथे कोव्हिड सेंटरमध्ये दाखल करण्यासाठी गेल्यानंतर रूग्णांना वेगळाच फटका सहन करावा लागला. वेळणेश्वर येथे गेल्यानंतर गुहागरच्या तहसीलदार यांनी ऑर्डर न दिल्यामुळे आरोग्य विभागाने त्या रुग्णाचा तब्बल 2 तास कोविड सेंटर च्या बाहेर ताटकळत राहावे लागले.

हेही वाचा - कोरोनाचा दुसरा टप्पा असू शकतो जास्त धोकादायक, WHOचा इशारा

प्रशासनात ताळमेळ नसल्यामुळे हा सर्व गोंधळ जवळपास दोन तास सुरू होता. मात्र त्यानंतर हा पेच सुटला खरा.पण ज्या रुग्ण वाहिकेने त्या चार रुग्णांना आणलं त्या रुग्ण वाहिकेचे दरवाजे लॉक होऊन सर्व रुग्ण आत अडकून पडले. काही केल्या दरवाजा न उघडल्यामुळे आता काय करायचे हा प्रश्न प्रशासनासमोर उभा राहिला होता. पण काही काळानंतर आतल्या रुग्णांनीच शहाणपणा दाखवत खिडकीतून बाहेर जाणे पसंद केले. या सर्व प्रसंगामुळे गुहागरमधील प्रशासनाच्या कारभाराबाबत सर्वसामान्यांमधून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत.

दरम्यान, डोंबिवली पश्चिमेतील कोरोनाग्रस्त गर्भवती महिलेच्या पतीने रुग्णवाहिकेसाठी शास्त्रीनगर रुग्णालयास फोन केला असता रुग्णवाहिका व्यस्त आहेत. शक्य असल्यास महिलेला घेऊन ठाणे सिव्हील रुग्णालय गाठा असा सल्ला प्रशासनाकडून देण्यात आल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी घडला होता. महिलेला तब्बल सहा तास रुग्णवाहिकेसाठी वाट पाहावी लागली.

संपादन - अक्षय शितोळे

First published:
top videos

    Tags: Coronavirus, Ratnagiri