• Home
 • »
 • News
 • »
 • videsh
 • »
 • भावाला हवं होतं मुलं, सरोगेट आई होऊन बहिणीने पूर्ण केलं कुटुंब

भावाला हवं होतं मुलं, सरोगेट आई होऊन बहिणीने पूर्ण केलं कुटुंब

सध्या या घटनेची मोठी चर्चा सुरू आहे.

 • Share this:
  वॉशिंग्टन, 26 एप्रिल : समाजात भाऊ-बहिणीचं नातं पवित्र मानलं जातं. मात्र सख्ख्या बहिणीने भावाच्या मुलाला जन्म दिल्याचं तुम्ही कधी ऐकलं नाही. हे ऐकायला कदाचित अनेकांना वेगळं वाटत असेल. मात्र वॉशिंग्टनमध्ये अशीच एक घटना समोर आली आहे. येथे एका बहिणीने भावाच्या पाचव्या मुलाला जन्म दिला आहे. सध्या संपूर्ण अमेरिकेत हा चर्चेचा विषय ठरला आहे. डेलीमलेच्या बातमीनुसार एका व्यक्तीला आधी चार मुलं आहेत. त्याला पाचव्या मुलाची इच्छा होती. पाचव्या मुलामुळे कुटुंब पूर्ण होईल, असं त्याला वाटतं होतं. मात्र मेडिकल समस्या असल्यामुळे त्याची पत्नी पाचव्या मुलाला जन्म देऊ शकत नव्हती. त्यानंतर आपल्या सख्ख्या भावाची इच्छा पूर्ण करण्यासाठी 27 वर्षांची बहिण हिल्दे पेरिंगरेने मोठा निर्णय घेतला. आणि सरोगेसी प्रेग्नेंट झाली आणि आपल्या सख्खा भावाच्या मुलाला जन्म दिला. डिलिव्हरीनंतर महिलेने आपला भाऊ आणि वहिनीला पाचवा मुलगा सोपवला. हे ही वाचा-VIDEO:मुलीला 5 वेळा पाहिल्यानंतर दिला नकार; बंद खोलीत नवरदेवाला लाथांचा पाहुणचार हिल्डे पेरिंगेरने जानेवारी 2021 मध्ये आपल्या 35 वर्षांचा भाऊ इवान शेली आणि त्याची पत्नी 33 वर्षांची पत्नी केल्सेयच्या पाचव्या मुलाचा जन्म दिला होता. अत्यंत वेगळ्याच पद्धतीने जगात येणाऱ्या या बाळाने कुटुंबात आनंदाचं वातावरण झालं आहे. बहिणीच्या प्रेग्नेंसीचा संपूर्ण खर्च भावाने उचललं होतं.
  Published by:Meenal Gangurde
  First published: