जोहान्सबर्ग, 26 जून : दक्षिण आफ्रिकाच्या (South Africa) दक्षिणी शहर इस्ट लंडनच्या (East London) टाउनशिपच्या एका नाइट क्लबमध्ये (Nightclub) रविवारी कमीत कमी 17 तरुण मृतावस्थेत सापडले. पोलिसांनी याबाबत माहिती दिली. एका प्रांतीय पोलिसांच्या प्रवक्त्यांनी सांगितलं की, 17 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. हे सर्वजण लंडनस्थित सीनरी पार्कमधील एका स्थानिक क्लबमध्ये मारले गेले. अद्याप याबाबत नेमका प्रकार समजू शकलेला नाही. पोलीस या प्रकरणात तपास करीत आहे. मृतांमध्ये अधिकतर 18 ते 20 वर्षांमधील तरुण असल्याचं समोर आलं आहे.
घटनास्थळी असलेले ईस्टर्न केप प्रांतीय समुदाय आणि सुरक्षा विभागाचे अधिकारी उन्टी बिंकोस यांनी चेंगराचेंगरीमुळे मृत्यू झाल्याची शक्यता नाकारली. बिन्कोस यांनी एएफपीला सांगितलं की, ही चेंगराचेंगरी आहे. यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. कारण मृतांच्या शरीरावर कोणत्याही खूणा दिसत नाहीत.
मृतांच्या शरीरावर खुणा नाहीत...
स्थानिक वृत्तपत्र डिस्पॅचलाइवने (DispatchLive) दिलेल्या माहितीनुसार, टेबल, खुर्च्या आणि जमिनीवर मृतदेह पडलेले होते. त्यांच्या अंगावर कोणत्याही प्रकारच्या जखमा दिसल्या नाहीत. सोशल मीडियावरही यासंदर्भातील फोटो शेअर करण्यात आले आहे. या घटनेनंतर क्लबच्या बाहेर मृतांच्या आई-वडिलांची गर्दी जमा झाली आहे. त्यांना मिळालेल्या माहितीनुसार, हायस्कूलच्या परीक्षेनंतर मुलं पार्टी करीत आहेत. मात्र परिस्थिती काहीतरी वेगळीच दिसत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Death, South africa